थंडीत हिमाचल प्रदेशात भेट देण्यासारखी १० ठिकाणे

लाइफफंडा
Updated Dec 15, 2020 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिल्यानंतर थंडीची मजा घेण्यासाठी जर तुम्ही फिरण्याचा प्लान बनवत असाल तर हिमाचल प्रदेशातील याठिकाणांची नक्कीच मजा घेऊ शकता. 

himachal pradesh
थंडीत हिमाचल प्रदेशात भेट देण्यासारखी १० ठिकाणे 

थोडं पण कामाचं

  • हिमाचल प्रदेशातील कुफरीमध्ये मजा घ्या विंटर स्पोर्ट्सची
  • स्पीटी खोऱ्यात बर्फाचा नजारा
  • मनालीमध्ये नैसर्गिक सौंदर्य अनुभवा

मुंबई: डिसेंबर महिना(december month) हा हिवाळी सुट्टीचा महिना मानला जातो. या महिन्यात चांगली थंडीही असते. यातच लोकांना फिरायला खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशातील(Himachal pradesh) काही प्रमुख हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. तुम्ही जर हिमाचलला फिरायला जाण्याचा प्लान करत आहात तर ही बातमी नक्की वाचा..

रोहतांग

उत्तरेकडील मनाली आणि दक्षिणेकडे कुल्लूपाून ५१ किमी अंतरावर हे ठिकाण लेहच्या मुख्यमार्गावर आहे. रोहतांग पासपासून हिमालयाची सुंदर रांग पाहायला मिळते. येथे ढग पूर्णपणे पवर्तांखाली उतरलेले असते. त्यामुळे हे दृश्य फारच मनमोहक असते. डिसेंबरमध्ये येथे बर्फ पडत असल्याने निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच येथे ट्रेकिंग स्कायकिंगचीही मजा तुम्ही घेऊ शकता. 

कुफरी 

शिमलापासून २० किमी अंतरावर कुफरी हिमाचल प्रदेशातील सुंदर ठिकाण आहे. समुद्रतळापासून साधारण २२९० मीटर उंचीवर स्थित असलेल्या या ठिकाणी डिसेंबर महिन्यात थंडीमध्ये फिरण्यासाठी छान जागा आहे. येथे विंटर स्पोर्ट्स खेळले जातात. पर्यटक येथे ट्रेल्सच्या माध्यमातून ट्रेकिंगचा आनंदही घेतात. 

शिमला 

हिमाचलची राजधानी आणि लोकांचे आवडते हिलस्टेशन असलेले शिमला हे ठिकाण डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी खूपच सुंदर जागा आहे.  थंडीमध्ये बर्फाची चादर पसरवलेले पर्वत येथे पाहायला मिळायला. येथील थंडीमधील दृश्य हे साऱ्यांना लोभवणारे असते. फिशिंग, ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा तुम्ही येथे घेऊ शकता. तसेच हनिमूनसाठी हे नेहमीच हॉट डेस्टिनेशन राहिले आहे. 

स्पीटी व्हॅली

हिमालयाच्या जिला लाहौल स्पीटीमध्ये असलेली स्पीटी व्हॅली हे ठिकाण स्वर्गाहून कमी नाही. डिसेंबर महिन्यात येथे बर्फाची चादर पसरलेली असते. लडाख आणि तिबेटच्या सीमेजवळील या व्हॅलीमध्ये हिरवळ फार कमी दिसते. येथे सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली असते. 

पारशर 

मान्सूच्या दरम्यान डिसेंबरमध्ये पराशरचे अनोखे दृश्य येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना दिसते. हिमाचलमधील हे सुंदर ठिकाण आहे. हिमाचलच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. 

खज्जियार

याला भारतातील छोटे स्वित्झर्लंड म्हटले जाते. जर तुम्हाला शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य एकत्रित बघायचे असेल तर खज्जियारपेक्षा वेगळी जागा नाही. हे बेस्ट रोमँटिक ठिकाण आहे. 

सोलंग व्हॅली

डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी सोलंग व्हॅली हिमाचलमधील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. थंडीच्या दिवसांत येथे बर्फवृष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. येथे लाकडापासून बनवलेल्या वस्तू आणि दागिने खरेदी करू शकता. 

मनाली

जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्यासोबत अॅडव्हेंचर आवडते तर तुमच्यासाठी मनाली ही सुंदर जागा आहे. हे एक प्रसिद्ध हनीमून हिलस्टेसन आहे. व्हॅली ऑफ गॉड्सच्या नावाने मनाली ओळखली जाते. डिसेंबर महिन्यात तुम्ही येथे स्कायकिंग, हायकिंग, माऊटेनियरिंग आणि अन्य स्पोर्ट्स गेमचा आनंद घेऊ शकता. 

मलाना

डिसेंबरमध्ये महिन्यात तुम्ही मनालाच्या सुंदर व्हॅलीची मजा घेऊ शकता. हे एक प्रमुख डेस्टिनेशन आहे. येथे थंडीच्या दिवसांत स्कायकिंग, हायकिंगसारखे गेम्स असतात. 

कुल्लू 

कुल्लूला गॉड्स ऑफ व्हॅली असे म्हटले जाते. डिसेंबर महिन्यात थंडीमध्ये हे ठिकाण खूपच सुंदर असते. गुलाबी आणि सफेद रंगाच्या फुलांमुळे या जागेची शोभा इतकी वाढते की विचारूच नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी