Best Places to visit In Kerala : मुन्नार ते अलेप्पी; स्वर्गापेक्षा कमी नाहीत दक्षिण भारतातील हे पर्यटन स्थळं, नक्की द्या भेट

लाइफफंडा
Updated Mar 27, 2023 | 12:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Best Places to visit In Kerala : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना काही क्षण शांततेत घालवायचे असतात. यासाठी लोक वेकेशन प्लान करतात. लोकांना सुट्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. साउथमधील पर्यटनस्थळी अनेकांना सुट्टी साजरी करायची असली तरी. जर तुम्ही साउथमधे सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही केरळच्या या पर्यटन स्थळांवर क्वालिटी टाइम स्पेंड करु शकता

Best Places In Kerala : From Munnar to Alleppey, this tourist spot in South is nothing less than a paradise, definitely visit
केरळ हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना काही क्षण शांततेत घालवायचे असतात
  • केरळ हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक
  • धार्मिक पर्यटनस्थळे आहेत जी येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात

Best Places to visit In Kerala : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना काही क्षण शांततेत घालवायचे असतात. यासाठी लोक वेकेशन प्लान करतात. लोकांना सुट्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. साउथमधील पर्यटनस्थळी अनेकांना सुट्टी साजरी करायची असली तरी. जर तुम्ही साउथमधे सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही केरळच्या या पर्यटन स्थळांवर क्वालिटी टाइम स्पेंड करु शकता. (Best Places In Kerala : From Munnar to Alleppey, this tourist spot in South is nothing less than a paradise, definitely visit)

केरळ हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या राज्यातील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे आहे. केरळमध्ये अनेक ऐतिहासिक, नैसर्गिक, समुद्रकिनारे आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत जी येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दक्षिणेला जाण्याचा विचार करत असाल तर केरळमधील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

केरळमध्ये भेट देण्याची ठिकाणे

मुन्नार

मुन्नार हे केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. चहाच्या बागा आणि हिरवेगार जंगल पर्यटकांना आकर्षित करते. त्याच वेळी, आपण ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसारख्या साहसी गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

अल्लेप्पी

अलेप्पी हे केरळमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे तुम्ही बॅकवॉटर ट्रिपचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही येथे हाऊस बोटवर रात्र घालवू शकता. अशा परिस्थितीत जर तुमचा केरळला जायचा प्लॅन असेल तर अलेप्पीला नक्की जा.

अधिक वाचा :या शहरांमध्ये एन्जॉय करा नाइटलाइफ

कोची

अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोचीला केरळचे प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हटले जाते. हे लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. कोची हे शॉपिंग मार्केटसाठीही प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसारख्या अॅक्टीविटीचा आनंद घेऊ शकता.

अधिक वाचा :उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रिपला जायचंय? ही आहेत भारतातील टॉप डेस्टिनेशन

तिरुवनंतपुरम

तिरुवनंतपुरम, जे त्रिवेंद्रम म्हणून प्रसिद्ध आहे, ही केरळची राजधानी आहे. तिरुअनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे तुम्ही बोट रायडिंग, पॅराग्लायडिंग, सर्फिंग आणि हॉर्स राइडिंग यांसारख्या अॅडवेंचरचा आनंद घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी