झोपताना उशीखाली मोबाईल ठेवून झोपत असल्यास सावधान, या आजारांना आमंत्रण

लाइफफंडा
Updated Oct 10, 2021 | 15:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच मोबाईल नावाच्या व्यसनाने ग्रासलं आहे. मोबाईल जवळ घेऊन झोपल्याने तुमची झोप मो़ड होतेच शिवाय त्यातील रेडिएशनचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात.

Beware if sleeping with a mobile under the pillow while sleeping, inviting these ailments
झोपताना उशीखाली मोबाईल ठेवून झोपत असल्यास सावधान, या आजारांना आमंत्रण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोबाईल वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेसुद्धा
  • दिवसाचा शेवट आणि दुसऱ्या दिवशीची सुरूवात त्यांची मोबाईलच्या दर्शनानेच
  • मोबाईलमधील रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम

मुंबई : आजकाल मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोना आणि लाॅकडाऊननंतर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन स्कुलमुळेतर घरातील प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. काही जणांना तर मोबाईलची सवय इतकी असते की ते झोपताना मोबाईल त्यांच्या उशीजवळ ठेवून झोपतात. जाणून घ्या या सवयीचे काय तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. (Beware if sleeping with a mobile under the pillow while sleeping, inviting these ailments)

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच मोबाईल नावाच्या व्यसनाने ग्रासलं आहे. रात्री फोन कॉल, मेल, मेसेज तपासण्यासाठी अंथरूणातून उठायला लागू नये यासाठी ते उशीखाली हा पर्याय निवडतात. त्यामुळे तुमची झोपमो़ड होतेच शिवाय मोबाईलमधील रेडिएशनचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात.यासाठी रात्री झोपताना फोन जवळ ठेवण्याची सवय त्वरीत बदला.

हानिकारक लहरींचा अल्झामरसारखे विकार

मोबाईल फोनमधून सतत रेडिओ फ्रिक्वेंसी  निघत असतात. ज्याचा तुमच्या मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो. काही संशोधनात यामुळे गंभीर आजार होत असल्याचे आढळून आले आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे रात्री झोपूनही तुम्हाला दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि निरूत्साही वाटू शकते. फोनमधून येणाऱ्या या हानिकारक लहरींचा तुमच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे अल्झामरसारखे विकार होऊ शकतात.

कर्करोग आजारांचा धोका

कर्करोग अथवा इतर घातक आजाराचा धोका या सवयीमुळे वाढण्याची शक्यता आहे. रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे तुम्हाला अनिद्रा आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात. मोबाईलच्या या लहरींमुळे माणसाच्या डिएनए स्ट्रक्चरवर परिणाम होत असल्याचं काही संशोधनात आढळून आलं आहे. 

डिप्रेशन आणि ताणतणावाचा धोका

मोबाईल पाहत रात्री झोपल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यावर होण्याची शक्यता असते. जे लोक रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवतात त्यांना जास्त प्रमाणात डिप्रेशन आणि ताणतणावाचा धोका असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी