Bhaubeej 2021 Shubh Muhurat: यंदा भाऊबीज दिवशी कोणत्या वेळेत कराल भावांची ओवाळणी; जाणून घ्या अत्यंत शुभ मुहूर्त!

bhaubeej 2021 shubh muhurat : भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो.

bhaubeej 2021 shubh muhurat timings to perform bhai tika ovalani Aukshan on 6th November 2021
भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळण्याचा अत्यंत शुभ मुहूर्त  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो
  • या दिवशी बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यम द्वितिया साजरी केली जाते.
  • बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते.

bhaubeej 2021 shubh muhurat timings :  दिवाळी (Diwali) सणाची सांगता सोमवार, 6 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज (Bhaubeej)  होणार आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या धामधूमीमधील शेवटचा सण असतो. या दिवशी बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यम द्वितिया साजरी केली जाते. बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने नेमकी भावाची ओवाळणी कधी करायची असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घ्या भाऊबीज 2021 मधील यंदाचा भावाच्या ओवाळणीचा नेमका मुहूर्त कधी आहे? (bhaubeej 2021 shubh muhurat timings to perform bhai tika ovalani Aukshan on 6th November)

भारतामध्ये भावा-बहीणाच्या प्रेमाचा, स्नेहाचा धागा वर्षागणिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन महत्त्वाचे सण आहेत. दिवाळीत कार्तिक शुक्ल द्वितीयेला यम द्वितिया म्हणजेच भाऊबीज साजरी केली जाते.


कधी आहे भाऊबीज (Bhaubeej 2021 Date, Shubh Muhurta)

हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी भाऊबीजचा पवित्र सण 6 नोव्हेंबर 2021 रोजी (शनिवार) आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत आहे. म्हणजेच शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी 2 तास 11 मिनिटे आहे.

पुराणामधील कथांनुसार, मृत्यूदेव यम हे आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन , भोजनाचा आनंद घेऊन आले होते. तो हा दिवस यमद्वितिया. त्यामुळे आजही भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन हा सण साजरा करतो. तिच्याकडे जेवण करून, ओवाळणी करून घेऊन तिला भेटवस्तू देऊन त्यांच्यामधील नात्याचा गोडवा वृद्धिंगत करतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी