Bhaubeej 2021 Message in Marathi: भाऊबीज सणाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status

Bhaubeej 2021 Message in Marathi: आपला भाऊ अथवा बहिण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्यासाठी मराठीतील हे खास शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवू शकता.

bhaubeej 2021 wishes in marathi through messages greetings to send your lovable brothers and sisters Bhai Dooj
भाऊबीज सणाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status  
थोडं पण कामाचं
  • भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज (BhaiBeej).
  • या सणाला उत्तर भारतात भाई दूज म्हणून ओळखले जाते.
  • या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळिणी स्वरुप तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन तिला देतो.

Bhaubeej 2021 Message in Marathi: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज (BhaiBeej). या सणाला उत्तर भारतात भाई दूज ((Bhai Dooj) म्हणून ओळखले जाते.  या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळिणी स्वरुप तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन तिला देतो. तसेच ओवाळणीत काही भेटवस्तूही तिला देतो. तसेच बहिणही आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात भाऊबीजेचा सण साजरा केला जाईल. या मंगलदिनी आपल्या लाडक्या भावाला वा बहिणीला मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. (bhaubeej 2021 wishes in marathi through messages greetings to send your lovable brothers and sisters Bhai Dooj )

या दिवसाचे महत्व अगदी थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी आणि आपला भाऊ अथवा बहिण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव करुन देण्यासाठी मराठीतील हे खास शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवू शकता.

भाऊबीज शुभेच्छा 

bhaubeej 2021 Marathi Message 3

                                                     Bhaubeej Marathi Messages 2021 : Photo BCCL 
उत्सव आपुलकीचा

उत्सव आनंदाचा

उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा

उत्सव नाती जपण्याचा

भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

bhaubeej 2021 Marathi Message 4

                                                     Bhaubeej Marathi Messages 2021 : Photo BCCL 


भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा

अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

bhaubeej 2021 Marathi Message

                                                     Bhaubeej Marathi Messages 2021 : Photo BCCL 

बहिण भावाचा, सण सौख्याचा

 देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा

आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा

आला सण भाऊबीजेचा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

bhaubeej 2021 Marathi Message 1

                                                     Bhaubeej Marathi Messages 2021 : Photo BCCL 


रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन

आठवूनी एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण

मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण

भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

bhaubeej 2021 Marathi Message 2

                                                     Bhaubeej Marathi Messages 2021 : Photo BCCL 

ओवाळीते तुज भाऊराया

कायम असू दे तुझी मजवर माया

तुझवर कधी न पडो दु:खाची काळी छाया

हेच मागणे तुज देवराया

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी