Today in History: Sunday, 7th August 2022 : आज आहे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, तसेच भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम.एस.स्वामीनाथन यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती
 • ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
 • भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम.एस.स्वामीनाथन यांचा जन्मदिन

Today in History: Sunday, 7th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. (birth anniversary of Rabindranath Tagore and know more today in history of 7th august 2022

अधिक वाचा : Independence Day 2022 Flags Online: ईपोस्ट ऑफिसमधून ऑनलाईन खरेदी करा तिरंगा

७ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
 2. १९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
 3. १९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
 4. १९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
 5. १९९०: आखाती युद्धासाठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
 6. १९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
 7. १९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
 8. १९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
 9. १९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
 10. १९४२: दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्या  महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
 11. १७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.

अधिक वाचा : Happy Independence Day Images 2022: स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी Download करा हे Independence Day स्पेशल फोटो

७ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९६६: जिमी वेल्स - विकिपीडियाचे सह-संस्थापक
 2. १९४८: ग्रेग चॅपेल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
 3. १९३६: डॉ. आनंद कर्वे - दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते
 4. १९२५: एम. एस. स्वामीनाथन - भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
 5. १९१२: केशवराव कृष्णराव दाते - हृदयरोगतज्ञ - पद्म भूषण
 6. १८७६: माता हारी - पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (निधन: १५ ऑक्टोबर १९१७)

अधिक वाचा : Independence Day Speech 2022: असे तयार करा स्वातंत्र्यदिनाचे भाषण 

७ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. १९७४: अंजनीबाई मालपेकर - भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
 2. १९४१: रबिन्द्रनाथ टागोर - कवी, तत्वचिंतक, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ मे १८६१)
 3. १९३४: जोसेफ मॅरी जाकॉर्ड - जॅक्वार्ड लूमचे शोधक (जन्म: ७ जुलै १७५२)
 4. १८४८: जेकब बर्झेलिअस - स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी