Black Friday Sales 2022: या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल, अमेझॉनवर 85 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

या शुक्रवारपासून अमेझॉनसह अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात होत असून अनेक उत्पादनांवर भलेमोठे डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरीची ऑफर देण्यात आली आहे.

Black Friday Sales 2022
या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर घसघशीत डिस्काऊंट
  • 20 टक्क्यांपासून ते 80 टक्क्यापर्यंत मिळणार सूट
  • या शुक्रवारपासून विविध प्लॅटफॉर्मवर सुरू होतोय सेल

Black Friday Sales 2022: ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करणाऱ्यांसाठी घसघशीत सूट मिळणे, ही एक प्रकारची दिवाळीच असते. येत्या शुक्रवारपासून ग्राहकांची अशीच दिवाळी सुरु होत आहे. या शुक्रवारपासून अमेझॉनसह अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (E Commerce platform) ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात होत असून अनेक उत्पादनांवर भलेमोठे डिस्काउंट आणि फ्री होम डिलिव्हरीची ऑफर देण्यात आली आहे. दरवर्षी पाश्चिमात्य देशांत ब्लॅक फ्रायडेनंतर ख्रिसमसची खरी लगबग सुरु होत असते. ब्लॅक फ्रायडेनंतरच लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून नाताळसाठीची खरेदी करायला सुरुवात करतात. या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक मोठे ब्रँड या काळात आपली अधिकाधिक उत्पादने विकली जावीत, यासाठी सेल लावताना दिसतात. अशाच एका मोठ्या सेलची सुरुवात यंदाच्या शुक्रवारपासून होणार आहे. 

भलेमोठे डिस्काउंट

भारतात यंदा 25 नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॅक फ्रायडे’ आहे. या दिवसापासून अमेझॉनवर मोठ्या सेलला सुरुवात होत आहे. मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँडच्या उत्पादनांवर तब्बल 85 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे. इतक्या डिस्काउंटसह फ्री डिलिव्हरीदेखील दिली जाणार असल्याची घोषणा अमेझॉनकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बाय वन गेट वन, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स अशा अनेक ऑफरही सुरु होणार आहेत.

अधिक वाचा - Dishwashing Tips: थंडीत भांडी घासणं जीवावर येतं? या ट्रिक्स पडतील उपयोगी

विविध ई-कॉमर्स साईट्सवर ऑफर

अमेझॉनवर हा सेल सुरु होणार आहेच. त्याशिवाय Myntra, टाटा लक्झरी अशा अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरदेखील सेल सुरु होत आहेत. काही प्लॅटफॉर्मवर हा सेल चार दिवसांपर्यंत तर काही प्लॅटफॉर्मवर आठवडाभर सुरु असणार आहे. जाणून घेऊया, कुठल्या प्रमुख प्लॅटफॉर्मने काय ऑफर दिली आहे. 

Tata CLiQ

टाटा क्लिक या प्लॅटफॉर्मने फॅशन, सौंदर्य, दागिने आणि तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांवर डिस्काऊंटची घोषणा केली आहे. या सेलमध्ये जास्तीत जास्त 85 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

Nykaa

Nykaa वरून तुमची आवडती ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या ब्रँडची उत्पादने आणि त्यांचे कॉम्बोज यांच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर कऱण्यात आली आहे. 

अधिक वाचा - Loneliness explained: एकटेपणा म्हणजे नेमकं काय? गर्दीतही का वाटतं सुनं सुनं? वाचा कारण

Myntra

Myntra या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 25 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. साधारणतः 40 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट या ऑफरमध्ये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही बँकांच्या कार्डवरही ऑफर देण्यात आली आहे. उदाहरणार्थ पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडीट कार्डचा वापर केला तर 10 टक्के डिस्काउंट, सिटी बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट सेव्हिंग अशा ऑफर देण्यात आल्या आहेत. 

सॅमसंग

स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन्स, टीव्ही यावर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्याची घोषणा सॅमसंगकडून कऱण्यात आली आहे. काही बँकांच्या क्रेडीट कार्डवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटही दिला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी