Claudia Raia Becomes a Mother : ब्राझिलियन टेलिनोवेला दिवा क्लॉडिया राया यांनी वयाच्या 56 व्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. क्लॉडिया राय यांनी मुलाच्या जन्माची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली होती. याशिवाय त्यांचा आणि पती जरबास होमम डी मेलो यांचा बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यापूर्वी या जोडप्याला 19 वर्षांची मुलगी सोफिया आणि 25 वर्षांचा मुलगा एन्झो आहे. पण आता वयाच्या 56 व्या वर्षी आई बनल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. राया आयवीएफशिवाय म्हणजेच नैसर्गिकरित्या गरोदर राहिल्या. त्यामुळे डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. बोस्टनमधील स्त्री तज्ञ डॉ. एलिझाबेथ साराह गिन्सबर्ग यांच्या मतानुसार, अशा प्रकरणांची शक्यता फक्त 1% आहे. (Brazilian telenovela diva Claudia Raia Becomes a Mother At Age 56)
अधिक वाचा: Long Distance Relationship ला लाँग लाइफ द्यायची असेल तर नात्यात 'या' छोट्या चुका करणे टाळा
जेव्हापासून राया यांनी बाळाच्या आगमनाची बातमी दिली तेव्हापासून त्यांना ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, "तू मुलाच्या आजीसारखी दिसत आहेस." एका व्यक्तीने म्हटले की."तु मुलाची आजी आहे की पणजी?" दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाच्या जन्माने राया यांना मात्र खूप आनंद झालयाचे दिसत आहे.
अधिक वाचा: Top 10 Whisky in Marathi: या आहेत जगातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 10 Whisky ब्रॅंडस
डॉक्टर काय म्हणतात?
56 व्या वर्षी आई होण्याबद्दल गुडगावच्या मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता वझीर म्हणतात, स्त्रीला आई होण्यासाठी वय हा महत्त्वाचा घटक आहे. वृद्ध महिलांना गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटा प्रीव्हियाचा धोका होऊ शकतो. याशिवाय इमर्जन्सी सिझेरियन, प्रसूतीनंतर रक्तस्राव आणि कमी वजनाचा धोकाही संभवू शकतो आणि हा धोका वयाबरोबर वाढत जातो.
अशा वेळी काय करावे
गरोदर होण्याआधी महिलांनी STI चाचणी, निरोगी गर्भधारणेसाठीचे वजन, न्यूट्रिशियन आणि इतर गोष्टींबाबत एकदा आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. सुरक्षित गर्भधारणा कशी करावी यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला टिप्स देखील देऊ शकतात.
प्रजनन क्षमता कमी होते
40 वर्षांनंतर, गरोदर राहणे आव्हानात्मक ठरते. महिलांमध्ये 35 व्या वर्षांनंतर गर्भाशयात गर्भ तयार करण्याची गुणवत्ता कमी होऊ लागते. वृद्ध स्त्रिया अनुवांशिक दोषांमुळे अधिक असुरक्षित असतात. एंडोमेट्रिओसिस आणि गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स या दोन परिस्थिती वृद्ध स्त्रियांमध्ये खूप सामान्य आहेत. मात्र रियाच्या गरोदरपणात कोणतीही गुंतागुंत झाल्याची नोंद नाही. डॉक्टरांच्या मते, वयाच्या चाळीशीनंतर गरोदर राहिल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो आणि आईला जेस्टेशनल डायबिटीज होण्याचा धोका असतो.