Skin Care: सणासुदीत पार्लरमध्ये जायला वेळ नाही, मग या टीप्स वापरून त्वचेवर आणा चमकदार

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Oct 29, 2022 | 17:13 IST

Skin Care: चेहऱ्यावर चमक येण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही सणासुदीच्या कामात खूप व्यस्त असाल तर काही उपायांनी तुमच्या चेहऱ्यावर चमक येऊ शकते. चला काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया.

Skin Care tips in marathi
सणासुदीत पार्लरला न जाता घरच्या घरी या फेस पॅकनी चमकवा चेहरा 
थोडं पण कामाचं
  • सणांमध्ये घराची साफसफाई (cleaning) करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत आणि विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यापर्यंत महिलांकडे स्वत:साठी फारच कमी वेळ असतो.
  • तुम्हालाही सणासुदीच्या कामातून ब्रेक मिळत नसेल तर काळजी करू नका.
  • सणासुदीच्या काळात महिलांना खूप काम करावे लागते.

मुंबई:  Homemade Pack: सणासुदीच्या काळात महिलांना खूप काम करावे लागते. विशेषत: दिवाळी आणि छठ (Diwali and Chhath)  यांसारख्या सणांमध्ये घराची साफसफाई (cleaning) करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत आणि विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यापर्यंत महिलांकडे स्वत:साठी फारच कमी वेळ असतो. त्यामुळेच सण आला की त्यांचा चेहरा खूप थकलेला दिसतो. तुम्हालाही सणासुदीच्या कामातून ब्रेक मिळत नसेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय (remedies) सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक मिळवू शकता. चला काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया. 

घरी तांदळाच्या पिठाची पेस्ट लावा

सणासुदीत तुमचा लूक सुधारण्यासाठी तांदळाच्या पिठाची पेस्ट चेहऱ्यावर लावा. यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ घ्या. त्यात 1 चमचा मध मिसळा. यानंतर त्यात थोडेसे गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. पेस्ट चेहऱ्यावरून सुकल्यावर चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

अधिक वाचा-  दुसरे ग्रहण!  वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा असा होणार परिणाम

सफेद तिळाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा

सफेद तिळाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या सौंदर्यात भर पडेल. यासाठी सफेद तीळ चांगले बारीक करून घ्यावेत. आता त्यात थोडी हळद मिसळा आणि चेहऱ्याला लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. तसेच हिवाळ्यातही चेहरा फुलतो.

केळीचा फेस पॅक लावा

जर तुम्हाला उन्हात बाहेर पडताना टॅनिंगची खूप समस्या येत असेल तर केळ्याचा फेस पॅक तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. यासाठी पिकलेले केळे चांगले मॅश करा. आता त्यात एक चमचा मैदा आणि बेसन मिक्स करा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. नंतर ते घासून काढा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी