Budget Honeymoon in India : देशातील या ठिकाणी बजेटमध्ये हनिमूनचे प्लॅनिंग होऊ शकते, नात्याची रोमँटिक सुरुवात

लाइफफंडा
Updated Jul 10, 2022 | 23:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Where to go for honeymoon in India: तुम्ही भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशन शोधत आहात, तर अशा पर्यायांची कमतरता नाही. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही कमी खर्चात तुमच्या नात्याची रोमँटिक सुरुवात करू शकता.

Budget honeymoon Destination in India, the romantic beginning of a relationship
बजेट हनिमून, नात्याची रोमँटिक सुरुवात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशातील बजेट हनिमून,नात्याची रोमँटिक सुरुवात
  • भारतातील बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशन्स
  • गोवा, दार्जिलिंग, मनाली, इत्यादी 10 डेस्टिनेशन्स

Budget honeymoon destinations in India: लग्नानंतर हनिमून ट्रिपला जाण्यासाठी प्रत्येक जोडपे खूप उत्सुक असतात. लव्ह मॅरेज असो किंवा अँरेंज हनीमून, लग्न हे प्रत्येक जोडप्यासाठी नवीन अनुभव आणि रोमान्सने भरलेले असते. लग्नाआधीही अनेकदा जोडपे एकमेकांना हनिमूनला कुठे जायचे हे विचारतात. मात्र, बजेटमध्ये चांगली हनिमून प्रवासाची ठिकाणे शोधणे कधीकधी थोडे अवघड असते. लग्नाच्या गर्दीत अनेक वेळा जागा निवडणं, बुकिंग करणं, सगळं मॅनेज करणं एवढं टेन्शन असतं की काही कपल्स हनिमून प्लानच रद्द करतात. या तणावातून तुम्हाला वाचवण्यासाठी आम्ही काही बेस्ट हनिमून डेस्टिनेशन्स घेऊन आलो आहोत. जी सुंदर तसेच बजेट फ्रेंडली आहेत.


भारतातील बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशन्स

मनाली


स्वित्झर्लंडला जाणे सध्या तुमच्या बजेटमध्ये बसत नसल्यास निराश होऊ नका. कारण भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाणारे मनाली तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुमचे बजेट 10,000 च्या आसपास असेल तर तुमचा 3-4 दिवसांचा मनालीचा अनुभव खूप चांगला असू शकतो. मनालीमध्ये बाईक भाड्याने घेऊन तुम्ही निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. मठ पाहता येतात, लोकल साइट्स पाहता येतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवू शकता याचीही हमी.

दार्जिलिंग 

पश्चिम बंगालमध्ये असलेले हे शहर तुमच्या हनीमूनसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि जर तुम्ही चहाच्या बागांपासून ते टेकड्यांचे शौकीन असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत इथे नक्की या. देसी चाल धाल सोबतच तुम्हाला विदेशी रंगही इथे पाहायला मिळतील. 3 दिवसांच्या ट्रिपनुसार तुमचे बजेट 10-15 हजार असेल तर नक्कीच दार्जिलिंगला जा.

अधिक वाचा : एलआयसीच्या या प्लॅनमध्ये एकदा प्रिमियम भरा आणि मिळवा पेन्शन


गोवा

जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समुद्रकिनारा आवडत असेल तर, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर, बजेटमध्ये तुम्ही हनिमून सेलिब्रेट करू शकता.


लक्षद्वीपलक्षद्व

खूप गर्दीच्या ठिकाणापासून दूर कुठेतरी शांततेत काही दिवस घालवायचे असतील तर. जर तुम्हाला समुद्राजवळ बसून सुंदर  निसर्ग सौंदर्य बघायचे असेल तर लक्षद्वीप बेट तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. येथे तुम्ही 5-6 दिवसांच्या ट्रिपनुसार सुमारे 20,000 च्या बजेटमध्ये प्रवास करू शकता. ज्यामध्ये तुम्ही सन बाथ, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यासारख्या अनेक खेळांचा आनंद घेऊ शकता.

उटी

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला हिरवाई, निसर्ग आवडत असेल, तर उटीची सहल तुमच्या हनिमूनसाठी चांगली जागा असू शकते. 12 ते 15 हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही उटीला जाऊ शकता. 

नैनिताल

जर तुम्हाला हिल स्टेशनला जायला आवडत असेल तर नैनिताल नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहे. हे शहर अतिशय सुंदर तलावाभोवती वसलेले आहे. तुमची हनिमून ट्रिप खूप अविस्मरणीय बनवेल.

ऋषिकेश

जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत गंगेच्या कुशीत रमायचे असेल तर आणि तुमच्या हनिमूनला मजा करायची असेल तर तुमच्यासाठी ऋषिकेश हा एक उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हा सलाड

गुलमर्ग

या हिल स्टेशनचे सौंदर्य तुम्हाला वेड लावेल. बर्फाने झाकलेल्या सुंदर टेकड्या हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी आणखी रोमँटिक बनवतील. येथे तुम्ही अनेक प्रकारच्या हिवाळी खेळांचा आनंद घेऊ शकता. सुमारे 10 हजारांच्या बजेटमध्ये 5 दिवसांसाठी चांगली सहल करता येते.

कच्छ

पांढरे वाळवंट, जिथे तुम्हाला लोकगीते, नृत्य, खाद्यपदार्थ आणि बरेच साहसी अनुभव मिळण्याची हमी आहे. जर तुम्ही रण उत्सवाच्या आसपास आलात तर तुम्हाला सुमारे 10-12 हजारांच्या बजेटमध्ये चांगला अनुभव मिळू शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी