Chicken Recipe: घरी बनवा झटपट चविष्ट बटर चिकन, जाणून घ्या रेसिपी 

Chicken Recipe: बटर चिकनचं नाव ऐकताच चिकन खाणाऱ्याच्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं. जर का तुम्हाला ही रेसिपी घरी बनवायची असेल तर जाणून घ्या येथे संपूर्ण रेसिपी.

Butter Chicken Recipe
Chicken Recipe: घरी बनवा झटपट चविष्ट बटर चिकन, जाणून घ्या रेसिपी   |  फोटो सौजन्य: Getty Images

बटर चिकनचं नाव ऐकताच चिकन खाणाऱ्याच्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं. ही एक पंजाबी डिश आहे. ज्यात टोमॅटोची प्यूरीसोबत अनेक गरम मसाले वापरले जातात. याची चव इतकी अप्रतिम असते की एकदा खाल्ल्यावर तुमचं मन भरणार नाही. 

बटर चिकन नान किंवा कुल्चा सोबत सर्व्ह केलं जातं. जर का तुम्हाला रेस्टॉरंटसारखं खाणं घरीच बनवायचे असेल तर तुम्हाला ही बटर चिकनची रेसिरी जरूर ट्राय करायला पाहिजे. ही डिश बनवण्यासाठी थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया बटर चिकन बनवण्याची रेसिपी. 

बटर चिकनसाठी लागणारे साहित्य 

 • 400 ग्रॅम चिकन
 • 2 चमचा लाल मिरची पावडर
 • 2 चमचा आलं आणि लसूण पेस्ट
 • 2 चमचा मीठ
 • 2 चमचा लिंबाचा रस
 • दही
 • 1/2 टीस्पून गरम मसाला
 • 1 चमचा कसूरी मेथी 
 • 2 टी स्पून मोहरीचे तेल

ग्रेव्हीसाठी: 

 • 2 चमचा तेल
 • 2 बटरचे क्यूब्स
 • 2 ग्रॅम लवंग
 • 1 दालचिनी
 • 7 वेलची
 • 4 टोमॅटो, कापलेले
 • 1 चमचा लसूण
 • 1 चमचा आलं
 • 2 बटर क्यूब्स
 • 1 चमचा आलं लसणाची पेस्ट
 • 1.1/2 चमचा कसूरी मेथी
 • 2 चमचा मथ
 • 1 हिरवी मिरची
 • 2 टी स्पून वेलची पावडर
 • 1 मोठा चमचा क्रीम

बटर चिकन करण्याची कृती 

मॅरिनेशन तयार करण्यासाठी:

 1. एका भांड्यात कच्च्या चिकनचे पीस घ्या. त्यात मीठ, लाल मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस टाका. ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. 
 2. जवळपास 15-20 मिनिटांसाठी ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. 
 3. मिश्रण फ्रिजमधून काढल्यानंतर यात दही, मीठ, आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कसूरी मेथी आणि मोहरीचं तेल चांगलं मिसळा आणि एका तासासाठी नंतर मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
 4. मॅरिनेटिड चिकन ओव्हनमध्ये 30 मिनिटांच्या तीन चतुर्थांशपर्यंत शिजण्यासाठी रोस्ट करा. 

ग्रेव्हा तयार करण्यासाठी: 

 1. एका पॅनमध्ये 2 चमचा तेलासोबत बटर गरम करा. 
 2. यात लवंग, दालचिनी स्टिक, जायफळ आणि वेलची टाका. त्यानंतर त्यात टोमॅटो, लसूण आणि आलं टाका. हे मिश्रण व्यवस्थित शिजवा. त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्या. 
 3. एका अन्य पॅनमध्ये आलं लसणाची पेस्टसोबत बटर गरम करा. 
 4. आता त्यात टोमॅटोची प्युरी टाका. त्यात लाल मिरची पावडर, कसूरी मेथी, मध आणि शेवटी चिकन टाका. हे सर्व धीम्या आचेवर शिजवा.
 5. हिरवी मिरची, वेलची पावडर आणि क्रिम टाका. ते सर्व व्यवस्थित मिक्स करा. 
 6. चिकनच्यावर एक चमचा क्रिम टाका आणि सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी