Indian Food: तुम्हाला चविष्ट भारतीय जेवण बनवता येतं का? या स्पर्धेत घ्या भाग भारत सरकार देईल लाखोंचे बक्षीस

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 05, 2022 | 18:47 IST

तुम्ही चविष्ट (Tasty) भारतीय जेवण (Indian food) करण्याचे शौकीन आहात का? निरोगी (Healthy) आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही जेवण बनवता का, जर हो असेल तर सरकार (Government) तुम्हाला आयुर्वेदातील (Ayurveda) मास्टर शेफ (Master Chef) बनण्याचा आणि एक लाख रुपये बक्षीस जिंकण्याची संधी देत आहे. 

Can you make delicious Indian food?
सात मिनिटांचा व्हिडिओ बनवेल Master Chef 
थोडं पण कामाचं
  • आरोग्याची गुपिते जगासमोर आणण्यासाठी आयुष मंत्रालय अनोखी स्पर्धा
  • १० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज
  • गुजरातमधील गांधीनगर येथे होईल अंतिम फेरी

Indian Food:  नवी  दिल्ली :  तुम्ही चविष्ट (Tasty) भारतीय जेवण (Indian food) करण्याचे शौकीन आहात का? निरोगी (Healthy) आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही जेवण बनवता का, जर हो असेल तर सरकार (Government) तुम्हाला आयुर्वेदातील (Ayurveda) मास्टर शेफ (Master Chef) बनण्याचा आणि एक लाख रुपये बक्षीस जिंकण्याची संधी देत आहे. 

भारतीय खाद्य शैली जगासमोर आणण्याचा प्रयत्न 

भारतीय खाद्यपदार्थांचे गुण आणि त्यात दडलेली आरोग्याची गुपिते जगासमोर आणण्यासाठी आयुष मंत्रालय एक अनोखी मास्टर शेफ स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेची थीम आहे -‘Ahara for Poshan.’ सोप्या भाषेत सांगायचे तर पोषक आहार.

१० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज 

जर तुम्हाला वाटत असेल की भारतीय शैलीने तुम्ही शरीराला पोषक असे उत्तम स्वादिष्ट अन्न देखील बनवू शकता, तर तुम्ही या स्पर्धेत (AYUSH Ministry Master Chef Competition) १० एप्रिलपर्यंत अर्ज करू शकता. या स्पर्धेत ६ विविध श्रेणी असतील. 

या आहेत श्रेणी :-

- धान्य आधारित अन्न
- बाजरी आधारित अन्न
- काजू किंवा डाळीपासून बनवलेले अन्न
- फळे आणि भाज्या सह तयार पाककृती
- दुग्धजन्य पदार्थांवर आधारित आहार
- फ्यूजन - म्हणजे दोन पाककृतींचा संगम

आयुष मंत्रालयाला पाठवावा लागेल हा व्हिडिओ 

या स्पर्धेत १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकते. (AYUSH Ministry Master Chef Competition) मध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरावा लागेल. या स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि फॉर्म आयुष मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला ५ ते ७ मिनिटांचा कुकिंग व्हिडिओ अपलोड करावा लागेल. हा व्हिडिओ इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बनवला जाऊ शकतो. त्या व्हिडीओमध्ये जेवणाची रेसिपी आणि त्या पदार्थाचे फायदे सांगणे आवश्यक आहे. एक व्यक्ती फक्त एकच एंट्री पाठवू शकते.

22 एप्रिल रोजी गांधीनगर येथे होईल फायनल 

तुम्ही कोणतीही रेसिपी निवडाल, ती आयुषच्या तत्त्वांनुसार असावी. म्हणजेच त्या रेसिपीमध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर्स किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरू नयेत.  व्हिडिओच्या आधारे, प्रत्येक श्रेणीतून 5 लोक निवडले जातील. जे अंतिम फेरी गाठतील त्यांना 22 एप्रिल रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे होणाऱ्या आयुष गुंतवणूक समिटमध्ये अंतिम फेरीसाठी बोलावले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी