Car Free Day 2022: जगभर साजरा होतोय ‘कार फ्री डे’, एक दिवस कार न वापरल्याचे अनेक फायदे

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात आज ‘कार फ्री डे’ साजरा केला जात आहे.

Car Free Day 2022
जगभर साजरा होतोय ‘कार फ्री डे’  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • जगभरात साजरा होतोय ‘कार फ्री डे’
  • एक दिवस बंद करा कारचा वापर
  • सायकल वापऱण्याचा किंवा पायी चालण्याचा सल्ला

Car Free Day 2022 : जगातील वाढतं प्रदूषण (Growing pollution) हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. हे प्रदूषण कसं कमी करता येईल, याबाबत अनेक देश एकत्र येऊन सातत्याने विचार करत असतात. पर्यावरण राहिलं तरच मानवजात (Human being) टिकून राहिल. पर्यावरणाची हानी सुरुच राहिली, तर एक दिवस मानवजात आणि संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होण्याचा धोका आहे. हा धोका मानवाने ओळखला असला तरी त्यासाठी आवश्यक उपाय पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाहीत. त्यामुळेच जगभर पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश देणारे दिवस पाळले जातात. कार फ्री डे ही (Car free day) याच विचारातून पुढं आलेली संकल्पना आहे. 

काय आहे संकल्पना?

कार ही अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य बनली आहे. सध्या कामासाठी लोकांना बरंच अंतर पार करून जावं लागतं. त्यासाठी अनेकजण स्वतःच्या कारचा उपयोग करतात. मात्र कारमुळे प्रदूषण वाढतं आणि निसर्गाची हानी होण्याच्या प्रक्रियेला हातभारच लागतो. त्यामुळे दरवर्षी 22 सप्टेंबर या दिवशी ‘कार फ्री डे’ साजरा केला जातो. हा एक दिवस नागरिकांना कार न वापऱण्याचं आवाहन केलं जातं. अर्थात, एक दिवस कार न वापरल्याने काय फरक पडणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडेल. मात्र याचंही उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे. एक दिवस प्रतिकात्मकरित्या हा दिवस साजरा केल्यामुळे तरुण वर्गाला हा प्रश्न समजून घ्यायला मदत होईल आणि आरोग्यालाही फायदा होईल, असं सांगितलं जातं. 

अधिक वाचा - Today in History Thursday, 22nd September 2022: आज आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती, तसेच मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची पुण्यतिथी

काय होतो फायदा?

दररोज जगभरात लाखो टन इंधनाचा वापर कारसाठी केला जातो. एक दिवस जरी सर्वांनी कार वापऱणं बंद केलं, तरी लाखो टन इंधन वाचेल आणि तेवढ्या प्रमाणात प्रदूषण कमी होईल. त्यामुळे निसर्गाला सावरण्यासाठी थोडा वेळ मिळू शकेल. या दिवशी प्रवासासाठी सायकलचा वापर करावा किंवा पायी चालत प्रवास करावा, असं आवाहन केलं जातं. त्यामुळे आपल्या आरोग्यावरही त्याचा चांगलाच परिणाम होतो. 

अधिक वाचा - Personality Traits: कोणत्या महिन्यात झाला जन्म, कसे असेल तुमचे भविष्य, काय आहे जन्म महिना आणि पर्सनॅलिटीचा संबंध?

वारंवार हवा असा दिवस

वर्षातून हा दिवस साजरा करण्याऐवजी आता तो महिन्यातून एकदा साजरा करायला सुरुवात करावी, असा प्रस्ताव अनेक पर्यावरणप्रेमींनी मांडला आहे. आपल्या निसर्गाची कमीत कमी हानी होण्यासाठी आणि प्रदूषण आटोक्यात येण्यासाठी वारंवार असे दिवस साजरे केल्याचा फायदाच होईल, असं मत अनेक पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. 

पुढच्या पिढीचा विचार

या पिढीने जर प्रदूषण करण्याचे प्रमाण कमी केले नाही, तर पुढच्या पिढीला श्वास घेणेदेखील कठीण होईल, असं काही पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. शिवाय पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या इंधनाचे प्रमाणही मर्यादित आहे. त्याच्या अतिवापराने हा स्रोतही मानव संपवून टाकेल, अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा दिवस सर्वांनी साजरा करावा आणि आपल्या कारचा वापर एक दिवसासाठी बंद करावा, असं आवाहन कऱण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी