Diwali 2021: अननस नारळ बर्फीने करा दिवाळीचं सेलिब्रेशन

Diwali 2021 Sweet : मिठाईशिवाय सण अपूर्ण वाटतात. म्हणूनच या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही टेस्टी अननस नारळ बर्फीची ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

Celebrate Diwali with Pineapple Coconut Barfi
यंदाच्या दिवाळीत तोंड गोड करा अननस नारळ बर्फीने  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अननस नारळ बर्फीची मेजवानी
  • बनवायला सोपी... खायला चवीष्ट
  • यंदाची दिवाळी अननस नारळ बर्फीने करा सेलिब्रेट

Diwali 2021: सणासुदीचा दिवसांत घरगुती मिठाईशिवाय सण अपूर्ण वाटतो. जर तुम्ही घरी स्वादिष्ट मिठाई बनवण्याचा विचार करत असाल 
परंतु सोपी रेसिपी सापडत नसेल तर ही दिलेली रेसिपी नक्की ट्राय करा.. होय, आज आम्ही तुमच्यासाठी बर्फीची रेसिपी घेऊन आलो आहे, जी बनवायला खूप सोपी आहे .काही गोष्टींसह तुम्ही ही नारळ आणि अननस बर्फी घरी तयार करू शकता. ही खायला चविष्ट तर आहेच पण बनवायला जास्त वेळ लागत नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही बर्फी आवडते आणि खव्यासोबत आवडीचे अननस मिळाले तर काय हरकत आहे. चला तर मग जाणून घेऊया अननस बर्फीची सोपी रेसिपी.


अननस नारळ बर्फी रेसिपी रेसिपी 

साहित्य 

नारळ - २ कप
अननसाचे तुकडे - ४ कप
तूप - स्वयंपाक आणि ग्रीसिंगसाठी
साखर - १ कप
वेलची / वेलची पावडर - 1 टीस्पून


कृती

1 . नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडे तूप, किसलेले खोबरे घालून हलके परतून घ्या.
2. नंतर पेस्ट बनवण्यासाठी अननसाचे तुकडे घ्या आणि ते चांगले बारीक करा.
3. आता नारळात अननसाचे मिश्रण घालून चांगले मिसळा. नंतर त्यात साखर घालून चांगले वितळू द्या.
4. आता त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. सर्व गोष्टी नीट मिसळेपर्यंत ही पेस्ट चांगली शिजवा.
5. आता एक ट्रे घ्या आणि तूप किंवा लोणीने चांगले ग्रीस करा. नंतर ट्रेमध्ये नारळ आणि अननसाचे मिश्रण पसरवून सारखे पसरवा.
6. थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर त्याचे तुकडे करा. तुमची स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारी अननस नारळ बर्फी तयार आहे.. 

या सणासुदीत तुम्हाला काही नवीन आणि लवकर बनवायचे असेल तर ही बर्फी नक्की बनवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी