Mahashivratri 2023 Wishes in Marathi : महाशिवरात्री साजरी करा Images, Wishes, Greetings, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन

Mahashivratri 2023 wishes in Marathi :निमित्त आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करून तुम्ही आपल्या मित्र परिवारास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.

celebrate shiva shankaras day on the occasion of mahashivaratri 2023 with messages images wishes greetings whatsapp status
महाशिवरात्री साजरी करा शुभेच्छा देऊन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवरात्री अशी दर महिन्याला येते. मात्र, महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते आणि हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
  • भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी भाविक आपापल्या परीने प्रार्थना करतात. यावर्षी 2023 मध्ये महाशिवरात्री 18 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे.
  • महाशिवरात्रीच्या सणाचे विशेष महत्त्व आहे. कारण, ही शिव आणि शक्ती यांच्या मिलनाची रात्र आहे.

Happy Mahashivratri 2023 wishes in marathi: शिवरात्री अशी दर महिन्याला येते. मात्र, महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते आणि हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी भाविक आपापल्या परीने प्रार्थना करतात. यावर्षी 2023 मध्ये महाशिवरात्री 18 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे. सणाचे विशेष महत्त्व आहे. कारण, ही शिव आणि शक्ती यांच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात. (celebrate shiva shankaras day on the occasion of mahashivaratri 2023 with messages images wishes greetings whatsapp status)

धर्मग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिव प्रथमच अवतरले होते. शिवाचे स्वरूप ज्योतिर्लिंगाच्या म्हणजेच अग्नीच्या शिवलिंगाच्या रूपात होते. महाशिवरात्री निमित्त Images, Wishes, Greetings, Whatsapp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.

Mahashivratri 2023 Messages

ॐ नमः शिवाय…

हर हर महादेव !

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Mahashivratri 2023 Messages 1
दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahashivratri 2023 Messages 2
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

तुज विण शंभु मज कोण तारी…

हर हर महादेव

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahashivratri 2023 Messages 3
ॐ त्रियम्बकं यजामहे,

सुगन्धिं पुष्टिवर्धनं !

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahashivratri 2023 Messages 4

बेलाचे पान वाहतो महादेवाला,

करतो वंदन दैवताला ,

सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना

हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला

महाशिवराञी च्या शुभेच्छा.

ॐ नमः शिवाय.

Mahashivratri 2023 Messages 5
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी

आणि चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


महाशिवरात्रीच्या अनेक आख्यायिका आहेत. एका पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे माता पार्वतीचा विवाह भगवान शिवाशी फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला झाला. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी