Workplace challenge: करिअरमध्ये प्रगती करताना महिलांपुढं असतात ‘ही’ आव्हानं, वाचा सविस्तर

आर्थिक क्षेत्रापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. मात्र असं असलं तरीही महिलांना आज अनेक आव्हानांना सामाोरं जावंच लागतं. पुरुषप्रधान व्यवस्थेतील सर्व अडथळे दूर झाले असून महिलांना आता समान संधी मिळत असल्याचं चित्र आजही दूरच आहे. आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि बरेच अडथळे पार करत स्पर्धेत टिकून राहावं लागतं.

Workplace challenge
करिअरमध्ये प्रगती करताना महिलांसमोर असतात ‘ही’ आव्हानं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलांना करिअरमध्ये असतात अनेक आव्हाने
  • पुरुषांपेक्षा अनेक ठिकाणी मिळतो कमी पगार
  • लैंगिक छळ, छेडछाडीचा सामना करण्याचं आजही अनेक ठिकाणी आव्हान

Workplace Challenges: एकविसाव्या शतकात महिलांनी (Women) आता सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी केल्याचं दिसतं. काही बाबतीत तर महिला या अधिकच अग्रेसर असल्याचंही दिसून आलं आहे. आर्थिक क्षेत्रापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. मात्र असं असलं तरीही महिलांना आज अनेक आव्हानांना (Challenges) सामाोरं जावंच लागतं. पुरुषप्रधान व्यवस्थेतील सर्व अडथळे दूर झाले असून महिलांना आता समान संधी मिळत असल्याचं चित्र आजही दूरच आहे. आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि बरेच अडथळे पार करत स्पर्धेत टिकून राहावं लागतं. जाणून घेऊया, सध्याच्या काळात महिलांपुढे नेमकी कुठली आव्हानं असतात.

प्रेग्नन्सी

‘वुमन आयकॉन नेटवर्क’च्या रिपोर्टनुसार कुठल्याही कार्यालयात प्रेग्नंट महिलांसोबत भेदभाव करणं, हा कायद्याने गुन्हा असतो. मात्र तरीही अशा महिलांवर अप्रत्यक्ष दबाव येत असल्याचं चित्र अनेक कार्यालयांमध्ये दिसतं. अनेकींना आपल्याला जबरदस्तीनं रजा घेण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचा अनुभव येतो. वास्तविक, प्रत्येक महिलेला प्रेग्नन्सीदरम्यान रजा घेण्याची गरज पडतेच असं नाही. काही महिलांना प्रेग्नंट असताना रजा हवी असते, तर काहीजणी बाळंतपणानंतर रजा घेणं पसंत करतात. अनेक महिला या आवश्यक तेवढीच रजा घेऊन आपलं करिअर पुढे सुरु ठेवणं पसंत करतात. मात्र त्यांना कार्यालयातील आणि कुटुंबातीलही अनेक व्यक्ती पेड लिव्ह घेण्यासाठी आग्रह करत असल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Study Tips: पाठांतर करूनदेखील विस्मरण होते का? मग या 5 टिप्सने वाढवा स्मरणशक्ती

समान मोबदला

अनेक ठिकाणी महिलांच्या पुरुषांपेक्षा जास्त काम करावं लागतं. मात्र त्यांचा पगार पुरुषांच्या तुलनेत कमी असतो. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला कंपनीत ‘पे ऑडिट’ची मागणी करू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना कार्यालयाच्या प्रशासनासोबत संघर्ष करण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांची नोकरीही धोक्यात येण्याची शक्यता असते. समान वेतन देण्यात येत असलेल्या कंपन्या शोधणं, हेदेखील महिलांसमोरचं एक मोठं आव्हान असतं. 

नेतृत्वाच्या कमी संधी

भारतात अशा अनेक संस्था आहेत, जिथं नेतृत्वासाठी महिलांपेक्षा पुरुषांनाच प्राधान्य दिलं जातं. पुरुष कर्मचाऱ्यांची निर्णयक्षमता ही महिलांपेक्षा अधिक चांगली असते, असा अनेकांचा गैरसमज असतो. आपल्या संस्थेतील जबाबदार व्यक्ती पुरुष असेल, तर ती अधिक समर्पितपणे काम करू शकेल आणि संस्थेसाठी अधिकाधिक वेळ देऊ शकेल, असंही काहीजणांना वाटत असतं. त्यामुळे समान क्षमता असूनही अनेकदा पुरुषांनाच नेतृत्वाची संधी देण्यात येते. त्यामुळे आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी आणि हक्काची जागा किंवा पद मिळवण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक संघर्ष करावा लागतो. 

अधिक वाचा - Relationship Tips : तुमचा जोडीदार देणार नाही नकार, रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त ही गोष्ट

लैंगिक छळ, छेडछाड

अनेक संस्थांमध्ये आजही महिलांना लैंगिक टोमणे मारणे, लाज वाटेल अशी कृत्ये करणे, टॉन्ट मारणे असे प्रकार घडतात. अशा प्रसंगी महिलांनी या बाबींना आक्षेप घेणे आणि वरिष्ठांकडे या प्रकाराची तक्रार करणे आवश्यक असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी