Chanakya Niti: तरुणांना उद्ध्वस्त करण्याऱ्या या वाईट सवयीपासून दूर राहण्यासाठी सांगतात चाणक्य...

Chanakya Niti: भारताच्या इतिहासात आचार्य चाणक्यला (Aacharya Chanakya) सर्वात कुशल राजकारणी आणि समाजशास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. याशिवाय ते एक निष्णात शिक्षकदेखील होते. चाणक्य नीतिद्वारे आजही लोकांना मार्गदर्शन केले जाते. चाणक्यची ओळख फक्त देशातच नाही तर परदेशातदेखील आहे. आचार्य चाणक्यची सूत्रे तरुणांसाठी आदर्श मानली जातात.

Aacharya Chanakya  advice to youth
चाणक्यची तरुणांसाठीची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • जीवनाच्या व्यवहारवादाची समज देणारी चाणक्य नीति
  • आचार्य चाणक्यने आपल्या सूत्रांनी तरुणांना दिला आहे धडा
  • तारुण्यात कोणत्या सवयींपासून सावध राहण्यास चाणक्यने सांगितले आहे

Chanakya Niti: नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात आचार्य चाणक्यला (Aacharya Chanakya) सर्वात कुशल राजकारणी आणि समाजशास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. याशिवाय ते एक निष्णात शिक्षकदेखील होते. चाणक्य नीतिद्वारे आजही लोकांना मार्गदर्शन केले जाते. चाणक्यची ओळख फक्त देशातच नाही तर परदेशातदेखील आहे. आचार्य चाणक्यची सूत्रे तरुणांसाठी आदर्श मानली जातात. आचार्य चाणक्यने कोणत्या सवयींपासून तरुणांना सावध केले आहे ते पाहा. (Chanakya adviced youth to avoid these bad habits)

तारुण्यावस्था धनासारखी

आचार्य चाणक्य तरुणांना म्हणतात तारुण्यावस्था धनासारखीच मूल्यवान असते. ज्या प्रकारे धर्मात साधनेचे महत्त्व असते, त्याच प्रकारे माणसाला ज्ञान आणि संस्कार मिळवण्यासाठी साधन करावी लागते. यातून माणूस तावून सलाखून निघतो. चाणक्यांच्या मते व्यक्तीला भविष्यात चांगले आयुष्य जगण्यासाठी तारण्यातच तपस्या करावी लागते. त्यामुळे तारुण्यावस्थेत तरुणांनी सजग आणि सतर्क राहिले पाहिजे. या वयातील थोडासा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्यामुळे तारुण्यावस्थेत या बाबींचे खूप भान ठेवले पाहिजे.

व्यसनाला टाळा

तारुण्यावस्थेत अनेक चुकीच्या गोष्टींचा प्रभाव असतो. जर कमी वयात चुकीच्या सवयी लागल्या तर त्यातून सुटका करून घेणे अवघड असते. तारुण्यावस्थेत नशेची सवय लागल्याने आयुष्य बरबाद होते. शिवाय आपल्या आजूबाजूच्या लोकांवरदेखील त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे तारुण्यात व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.

वाईट संगतीपासून दूर राहा

संगत किंवा सोबत यासंदर्भात भारतीय ग्रंथांमध्ये अनेक सूत्रे आणि धडे दिले आहेत. चाणक्य नीतिदेखील हेच सांगते. तरुणवयात सोबतीचा, मैत्रीचा थेट परिणाम होत असतो आणि त्याचा प्रभाव पूर्ण जीवनभर राहतो. चाणक्याने सांगितले आहे की मैत्री करताना आपण फारच सावध असले पाहिजे.

चांगल्या लोकांशी मैत्री केल्याने जीवनाला नवी दिशा मिळते आणि वाईट संगतीमुळे माणसाचे भविष्य अंधारात लोटले जाते.

आरोग्याची काळजी

चाणक्यानुसार तारुण्यात प्रत्येक तरुणाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तारुण्यावस्थेत शरीर आणि आरोग्य घडवले जाते. याचा लाभ आयुष्यभर मिळत राहतो. चाणक्यानुसार शरीर निरोगी असल्यास मन आणि मेंदू चांगला राहतो. शिवाय मेंदूने चांगले काम केल्याने जीवन चांगले घडते. यातूनच भविष्य घडते. तरुणवयात पौष्ठिक भोजन केले पाहिजे.

चाणक्य नीती सांगते की तरुणांनी आळसापासून दूर राहिले पाहिजे. तरुणांना जागे होण्यापासून ते झोपेपर्यंत नियम असावा. आळसाची सवय तेव्हाच फुलते जेव्हा एखादी व्यक्ती शिस्तीचे महत्त्व विसरते. आळस हा रोगासारखा मानला जातो. त्यामुळे तरुणांनी यापासून दूर राहिले पाहिजे.एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते.

चाणक्य नीती तरुणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते. तरुणांनी वाईट सवयींपासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा, यश मिळवण्यात अडचण आहे.चाणक्य नीतीनुसार, तरुणांनी आपल्या लक्ष्याविषयी गंभीर असं आवश्यक असते. आपले ध्येय प्राप्तीसाठी आग्रही असावे, पण जे युवक आपल्या मार्गातून भरकटून जातात, ते चुकीच्या सवयींमध्ये लुप्त होत असतात आणि त्यांच्या नशीबी यशाचे सुख नसते.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी