Chanakya Neeti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले तत्वज्ञान (नितीशास्त्र) हे चाणक्यनिती या नावाने ओळखले जाते. याच आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या चंद्रगुप्त मौर्य याने पुढे मोठा पराक्रम केला आणि मगध साम्राज्याचा राजा सम्राट धनानंद याचे कुशासन मोडून काढले. नंतर हुशारीने कधी शस्त्रांचा वापर करून तर कधी बुद्धिचा वापर करून अनेक लहान-मोठ्या गणराज्यांना संघटित केले आणि अखंड आर्यवर्त (अखंड भारत) स्थापन केले. चंद्रगुप्ताच्या पराक्रमाला चाणक्यनितीचे अधिष्ठान होते. यामुळेच चाणक्यनिती ही आजही महत्त्वाची आहे. (Chanakya Neeti in Marathi Those who do these four things in life never get success)
आचार्य चाणक्य सांगतात माणसाला यश, किर्ती, धनसंपत्ती हवी असल्यास आधी चार अवगुणांपासून लांब राहणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्ती अवगुण असतील तर त्याने आधी अवगुणांना दूर लोटले पाहिजे. जी व्यक्ती खोटेपणा, अहंकार, लोभ, फसवणूक करणे या अवगुणांमध्ये अडकून पडली असेल ती व्यक्ती प्रगती करू शकत नाही. त्या व्यक्तीला यश, किर्ती, धनसंपत्ती मिळवता येत नाही.
कमकुवत, आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांना त्रास देणे हा एक मोठा अवगुण आहे. ज्याच्याकडे हा अवगुण आहे अशा व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही. या मंडळींना समाजात सन्मान मिळत नाही.
लोभ स्वतःचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरू शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, जी व्यक्ती लोभाच्या फेऱ्यात अडकते ती स्वतःचे नुकसान करून घेते. फसवणूक मिळवलेली संपत्ती आणि प्रतिष्ठा टिकत नाही. काही वेळा स्वतःच्या मोठ्या हानीचे कारण ठरू शकते. यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करून संपत्ती आणि प्रतिष्ठा कमवावी.
फसवणूक करणारे शेवटी एकटे पडतात. त्यांचे भले होत नाही. कोणाचीही त्यांना साथ मिळत नाही. फसवणूक करणाऱ्यांना कधी यश, किर्ती, संपत्ती यांचा सुखाने लाभ घेता येत नाही.
अहंकारी व्यक्ती स्वतःचा विनाश करते. अहंकारातून, अहं गंडातून माणसाचे नुकसान होते. जो अहंकारी असतो त्याची प्रगती थांबते. शिकण्याची क्षमता संपते. याच कारणांमुळे अहंकार विनाशकारी आहे. ज्याला प्रगती करायची आहे, यश, कित्ती धनसंपत्ती हवी आहे अशा व्यक्तीने सदैव विद्यार्थ्याप्रमाणे नवनव्या कौशल्यांना शिकणे आणि आत्मसात करणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : हा संकलित मजकूर आहे. इंटरनेटवर उपलब्ध आहे. टाइम्स नाउ मराठी या मजकुराची जबाबदारी घेत नाही. या मजकुराच्या विश्वासार्हतेविषयी टाइम्स नाउ मराठी खात्री देऊ शकत नाही.)