Chanakya Niti: महिलेला संतृष्ट करण्यासाठी अंगी हवेत कुत्र्याचे हे गुण

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 16, 2023 | 17:02 IST

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाचा डंका वाजवला होता. चाणक्य नीतिमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.  या गोष्टीचं आपण पालन केलं तर आपल्याला यश मिळत असते. पंरतु यश मिळण्यासाठी आपल्या अंगी चांगले गुण असणं आवश्यक असते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात महिलांच्या स्वभावाविषयी विस्तृत वर्णने केलं आहे.

Chanakya Niti:  A woman needs a body to satisfy these qualities like a dog
महिलेला संतृष्ट करण्यासाठी अंगी हवेत कुत्र्याचे हे गुण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात महिलांच्या स्वभावाविषयी विस्तृत वर्णने केलं आहे.
  • माणसाने शक्य तितके कष्ट केले पाहिजे आणि जे पैसे किंवा फळ मिळेल त्यात समाधानी आणि आनंदी असले पाहिजे.
  • नवरा-बायकोने आपल्या कर्तव्याविषयी सतर्क असणं आवश्यक आहे.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाचा डंका वाजवला होता. चाणक्य नीतिमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.  या गोष्टीचं आपण पालन केलं तर आपल्याला यश मिळत असते. पंरतु यश मिळण्यासाठी आपल्या अंगी चांगले गुण असणं आवश्यक असते.चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात महिलांच्या स्वभावाविषयी विस्तृत वर्णने केलं आहे.  

घरातील महिला जर सदगुणी असली तर घराची प्रगती होत असते. पुरुषांच्या गुणाविषयी बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की, जर व्यक्तीमध्ये एखाद्या कुत्र्याप्रमाणे गुण असले तर त्याची पत्नी समाधानी असते.  यामुळे कुटुंबात आंनद राहत असतो. चला तर जाणून घेऊया कुत्र्याचे कोणते गुण माणसामध्ये असणं आवश्यक आहे. 

1. संतुष्ट राहणे 

आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने शक्य तितके कष्ट केले पाहिजे आणि जे पैसे किंवा फळ मिळेल त्यात समाधानी आणि आनंदी असले पाहिजे. पुरुषांनी जितकी मेहनत घेतली असेल त्यातून मिळालेले धन किंवा संपत्ती त्यावर समाधानी असावे. ज्या पुरुषांकडे श्वानाचा हा गुण असेल ते लोक जीवनात यशस्वी होत असतात. 

अधिक वाचा  :पोरं झाल्यानंतर नवरा-बायकोचं नातं कसं घट्ट बनवणार

2. सतर्क असणं 

आचार्य चाणक्यांच्या मते, कुत्रा पहरा करत असताना झोपी गेला तरीही तो सतर्क असतो. गाढ झोपेत असला तरीही कुत्रा सतर्क असतो. त्याचप्रमाणे नवरा-बायकोने आपल्या कर्तव्याविषयी सतर्क असणं आवश्यक आहे. कुटुंबाच्या संरक्षणासाठी नेहमी सतर्क असणं आवश्यक आहे. तुम्ही गाढ झोपेत असला आणि काहीसा आवाज आला तरी जागे होत असाल तर पत्नी नेहमी खुश असते. 

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड

3.प्रामाणिकपणा 

हा गुण श्वानांना क्षेष्ठ बनवत असतो. हाच गुण पुरुषांकडे राहिला तर महिला त्यांच्यावर फिदा होत असतात. पतीने आपल्या पत्नीशी इमानदारीने प्रामाणिकपणे वागावे.  पतीने आपल्याशी प्रामाणिकपणे वागावे अशी अपेक्षा प्रत्येक पत्नीची असते. जे पुरुष दुसरी स्री पाहिलं  की लाळ गाळत असतील तर त्यांच्या घरात नेहमी भांडणं होत असतात. 

4. वीरता

चाणक्यांच्या मते, कुत्रे नीडर, आणि वीर असतात. ज्याप्रमाणे ते आपल्या मालकाची सुरक्षा करण्यासाठी आपला जीव दावणीला लावत असतात त्याच प्रमाणे प्रत्येक पुरुषांने आपल्या कुटुंबासाठी वागलं पाहिजे.  वेळे पडल्यास आपल्या कुटुंबासाठी जीव मुठीत घेऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. 

अधिक वाचा  : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं

5. संतुष्ट ठेवणं 

आचार्य चाणक्यांच्या मते, पुरुषाने आपल्या पत्नीला नेहमी संतृष्ट ठेवावे. नाहीतर त्या उंबरठा ओलंडत असतात. जे पुरुष आपल्या पत्नाला मानसीक आणि शारीरिक रुपाने समाधानी ठेवत असतील त्यांच्या घरात शांतता असते. असं करणारे पुरुष पत्नीचे प्रिय बनत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी