Chanakya Niti: विवाहित पुरूष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात?

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 12, 2023 | 10:10 IST

Chanakya Niti: पती-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याबद्दल (Relationship) तपशीलवार वर्णन केले आहे. नवरा- बायको यांचे प्रेम कधी वाढते त्यांच्यात वाद कोणत्या कारणांमुळे होतात आदी गोष्टींचे मार्गदर्शनही चाणक्यांनी केले आहे. सध्या वैवाहिक बाह्य संबंधाची (Extramarital affairs) समस्या वाढू लागली आहे. विवाहित पुरुष (married man) आणि स्त्रियां पती- पत्नीला सोडून दुसऱ्याकडे आकर्षित होत आहेत.  

Chanakya Niti
विवाहित पुरूष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विवाहित पुरुष आणि स्त्रियां पती- पत्नीला सोडून दुसऱ्याकडे आकर्षित होत आहेत.
  • कुमारी मुलींपेक्षा पुरुषांना विवाहित स्त्रियांमध्ये जास्त रस आहे.
  • पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंध महत्त्वाचे मानले जातात.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya)यांनी अर्थशास्त्रासह अनेक विषयांवर अभ्यास करुन अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांचे अमूल्य विचार खूप प्रसिद्ध आहेत.आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये व्यक्ती विशेषत: पती-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याबद्दल (Relationship) तपशीलवार वर्णन केले आहे. नवरा- बायको यांचे प्रेम कधी वाढते त्यांच्यात वाद कोणत्या कारणांमुळे होतात आदी गोष्टींचे मार्गदर्शनही चाणक्यांनी केले आहे. सध्या वैवाहिक बाह्य संबंधाची (Extramarital affairs) समस्या वाढू लागली आहे. विवाहित पुरुष (married man) आणि स्त्रियां पती- पत्नीला सोडून दुसऱ्याकडे आकर्षित होत आहेत. हे का होते हेही चाणक्यांनी सांगितले आहे. (Chanakya Niti: Are married men attracted to other women?)

अधिक वाचा  : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो
 
चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्त्वांवर भाष्य करण्यात आलंय. ज्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, संबंध, देश या गोष्टींचा समावेश आहे. अशातच  विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं सांगितली आहेत. स्त्रियांकडे पुरुषांचे आकर्षित होणं सामान्य आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कुमारी मुलींपेक्षा पुरुषांना विवाहित स्त्रियांमध्ये जास्त रस आहे. पुरुष आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित का होतो याचे काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

अधिक वाचा  : Daily Horoscope : कर्क राशीसह या 4 राशींसाठी आहेत धन लाभाचे योग

शारिरीक असमाधान 

पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंध महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे दोघांच्या नात्यात कमतरता दिसून येते. संबंध दुरावतात आणि नंतर नातं तुटण्याची देखील शक्यता असते.

अधिक वाचा  : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात

लग्नासाठी तयार नसणं 

अनेक जणांची फार कमी वयात लग्न होतात. त्यामुळे अंगावर जबाबदारी येते. तरुणवयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत जास्त गंभीर असते. कमी वयात समजही कमी असते. त्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात.

आकर्षण कमी होणं 

अनेकदा लग्नानंतर जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होताना दिसतं. त्याला वेगवेगळी कारणं असतात. वजन वाढणं किंवा शारिरीक व्याधींमुळे आकर्षण कमी होत जातं. त्याचा परिणाम बाह्य संबंध निर्माण होत असतात.

जोडीदारावर विश्वास ठेवा 

कोणतंही नातं असो विश्वास गरजेचा असतो. अनेकदा विश्वासावर साध्य ठरणारी माणसं नातं जपण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवा.

मुलांच्या जन्मानंतर होणारे बदल 

ज्यावेळी दोघेच असता त्यावेळी नातं चांगलं राहतं. मात्र, मुलांच्या जन्मानंतर नात्यात दुरावा निर्माण होते, त्यावेळी काळजी घेणं गरजेचं असतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी