Chanakya Niti:'या' वेळवर भ्रष्ट होत असते माणसांची बुद्धी; भगवान श्रीरामही वाचू शकले नव्हते या स्थितीपासून

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 13, 2022 | 13:05 IST

आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन सर्व बाजूंनी संकटांनी वेढलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी आणि विवेक त्याला सोडून जात असतो. या कठीण परिस्थितीत, एक अतिशय हुशार माणूस देखील कधीकधी योग्य आणि चुकीमधील फरक समजू शकत नसतो.

Chanakya Niti
Chanakya Niti:'या' वेळवर भ्रष्ट होत असते माणसांची बुद्धी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन सर्व बाजूंनी संकटांनी वेढलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी आणि विवेक त्याला सोडून जात असतो.
  • विचार करण्याची शक्ती गमावून बसल्यानंतर व्यक्ती डोक्याने काम करू शकत नाही.
  • हुशार माणूस देखील कधीकधी योग्य आणि चुकीमधील फरक समजू शकत नसतो.

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या चाणक्य नीतिमध्ये यशस्वी जीवनाविषयी मार्गदर्शन केले आहे. जीवनात (life) यश हवे तर कशाप्रकारे परिस्थितीचा आणि संकटाचा सामना केला पाहिजे, याचे मार्गदर्शनही त्यांनी दिली आहे. माणसाचे जीवन अपयश आणि यशाच्या ग्राफने भरलेले असते. (Chanakya Niti: At 'this' time, people's Brain didn't work sharply )

अधिक वाचा  :

काही सुवर्ण संधी आणि मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचतात, तर काहीजण एका चुकीमुळे आयुष्यभराची कमाई गमावून बसत असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, सर्वांचे जीवनमध्ये, अशी वेळ असते ज्यावेळी व्यक्ती आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसत असतो. ज्यावेळी व्यक्ती विचार करण्याची शक्ती गमावून बसल्यानंतर तो डोक्याने काम करू शकत नाही, मग तो मोठा हुशार आणि ज्ञानी का असेना.  अशा अवस्थेत अडकलेली व्यक्ती चुकीच्या मार्गावर चालते आणि मग समस्येवर उपाय शोधण्याऐवजी तो त्रास आणि दुःखाच्या दलदलीत अडकत असतो.  माणसाची बुद्धी जेव्हा भ्रष्ट होते आणि अशा परिस्थितीत त्याने काय करावे. याचे मार्गदर्शनही आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र केले आहे.  

अधिक वाचा  : गावाला जाण्याचा प्लान करा रद्द; Train झाल्या आहेत Cancel

न निर्मिता केन न दृष्टपूर्वा न श्रूयते हेममयी कुरङ्गी ।
तथाऽपि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः ।।

आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन सर्व बाजूंनी संकटांनी वेढलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी आणि विवेक त्याला सोडून जात असतो. या कठीण परिस्थितीत, एक अतिशय हुशार माणूस देखील कधीकधी योग्य आणि चुकीमधील फरक समजू शकत नसतो. त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर पडदा पडतो. चुकीच्या मार्गाचा अवलंब करून तो स्वतःचे नुकसान करत असतो. 

ही परिस्थिती इतकी वाईट असते की, भगवान रामाला ही  याची कल्पना आली नव्हती. आचार्य चाणक्यांनी श्लोकद्वारे  रामचंद्राचे उहाहरण दिले आहे.सोन्याचे हरीण कधी नव्हते, आजपर्यंत कोणी पाहिलेले नाही, पण वनवासाच्या काळात माता सीतेच्या सांगण्यावरून श्रीराम सोन्याचे हरण पकडण्यासाठी निघाले आणि इकडे रावणाने माता सीतेला पळवून नेले.

अधिक वाचा  : golden globe award 2023: 'RRR' चा जगभरात डंका

या एका चुकीच्या निर्णयामुळे माता सीतेचे अपहरण झाले आणि युद्ध झाले.आचार्य चाणक्य म्हणतात की, विनाशाच्या वेळी बुद्धीवर पडदा पडतो. अशा वेळी मन विचलित होऊन चुकीचे निर्णय घेऊ लागते. चाणक्य म्हणतात की, संकटाच्या वेळी मनावर ताबा ठेवायला शिकले तर अनेक समस्या टळू शकतात. 

 आचार्य म्हणतात की, अहंकार, लोभ आणि क्रोध हे सुद्धा माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याचे प्रमुख कारण आहेत. हे सोडून दिल्यास, एखाद्या व्यक्तीने संयमाने योग्य वेळेची प्रतीक्षा कशी करावी. तरच यश मिळू शकत,  हे सर्व व्यक्तींना माहिती असले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी