Chanakya Niti in marathi:आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे राजकारण (politics) आणि अर्थशास्त्राचे (economics) अभ्यासक मानले जातात. चाणक्याने नीतिशास्त्रात मानवाच्या जीवनाविषयी मार्गदर्शन (Guidance) केलं आहे. आचार्यांनी त्यात जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आचार्य चाणक्य यांनी मनुष्यला आपल्या जीवनात अनेक गोष्टीची खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्यात चार व्यक्ती अशा आहेत, ज्याच्यापासून माणसांनी चार हात लांब रहिलेलं कधीही उत्तम. वेळीच या लोकांपासून तुम्ही दूर झाला तर ठीक नाहीतर तुम्ही मोठ्या संकटात अडकाल. (Chanakya Niti: Beware of this, otherwise you will be in big trouble)
अधिक वाचा : जाणून घ्या नवसाला पावणाऱ्या काळूबाई मातेचं महत्त्व
आपल्या चाणक्य नीतिमध्ये आचार्यांनी मानवाचे जीवन सुखी आणि सोपं होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. सुखी आयुष्य हवे असेल तर माणसाने नकोत त्या चिंतेपासून दूर राहिलं पाहिजे. चाणक्यांनी सांगितलेल्या या चार व्यक्तीपासून तुम्ही दूर राहिले तर तुम्ही आनंदी जीवन जगण्याचा अनुभव घेऊ शकतात. आचार्य चाणक्यांनी या कोणत्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपण जाणून घेणार आहोत.
प्दुष्टाभार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायकः।
ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव नः संशयः ।।
या श्लोकात चाणक्याने सांगितले आहे की, दुष्ट पत्नी, धूर्त मित्र, धूर्त नोकर आणि सापासोबत राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
अधिक वाचा : नाशकात उद्योजकाच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि सुटका
चाणक्याच्या मते, जेव्हा पत्नी इतर पुरुषांबद्दल विचार करू लागली. जर ती आपल्या पतीची फसवणूक आणि विश्वासघात करू लागली, तर अशा स्त्रीचा सहवास म्हणजे नरक यातना भोगण्यासारखे असते. चाणक्य म्हणतात की अशा पत्नीशी काडीमोड केलेलं कधीही चांगले असते.
अधिक वाचा : खरे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजच : देवेंद्र फडणवीस
पत्नी आपल्यावर किती प्रेम करते हे जाणून घेण्यासाठी व्यक्तीने पत्नीची परीक्षा घेतली पाहिजे. यासाठी व्यक्तीने आर्थिक संकट असल्याचं भासवलं पाहिजे. आर्थिक संकट असताना जर पत्नी पतीला सोडून गेली किंवा आपल्या नवऱ्याचा आदर करत नाही अशा पत्नीशी नातेसंबंध ठेवून फायदा नसतो. कारण तिला कुटुंब नको फक्त पैसा हवा असतो.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जर नोकर तुमची आज्ञा पाळत नाही. तुमचा विश्वासघात करत असेल तर आपण साव झालं पाहिजे. कारण असे नोकर आपल्या मालकाचे कधीच चांगले झालेले बघू शकत नाहीत. ते मालकाचा विश्वासघात करतात. नोकरची देखील परीक्षा घेतली पाहिजे. त्याला आर्थिक गोष्टीवर त्याला पारखलं पाहिजे.
जेव्हा तो घराच्या कामासाठी बाहेर जात असेल तर त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. दिलेल्या पैशातून तो चोरी तर करत नाही ना याची खात्री केली पाहिजे. तसेच त्याच्या समोर तिजोरीच्या चाव्या सोडून आपण बाहेर थांबून त्याची परीक्षा घेतली पाहिजे. जर तो त्या चाव्या घेऊन तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्वरीत कामावरुन काढून टाकावे. ही परीक्षा घेताना तिजोरीत पैसे नसतील याची काळजी घ्या.
खरा मित्र संकटाच्या वेळीच ओळखला जातो. कठीण प्रसंगी तुमची साथ सोडणारा खरा मित्र असू शकत नाही. खोट्या आणि धुर्त मित्रांपासून दूर राहणे चांगले. यामुळे मैत्री करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मित्राला आपल्या दांपत्य जीवनाबाबतची माहिती कधीच नये. आपले उत्पन्न किती, खर्च किती, आपल्यावर कर्जाचा भार किती हेदेखील मित्रांना सांगू नये.
साप जिथे राहतात तिथे राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्या सारखे असते. कारण साप प्राणघातक असतात आणि कधीही आपल्याला दंश करू शकतात. सर्पाला किती दूध पाजले तरी तो त्याचा दंश करण्याचा गुणधर्म सोडणार नाही.