Chanakya Niti: माणसाचे जीवन चढ-उतारांनी भरलेले असते. आपल्या आयुष्यात कधी सुखाचा पाऊस तर कधी दु:खाचे दाट ढग येत असतात. चाणक्य म्हणतात की, माणसाचा चांगला आणि वाईट काळ त्याच्या कर्मावर अवलंबून असतो. आचार्य चाणाक्य हे राजकारण आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक मानले जातात. आचार्यांचे नीतिशास्त्र लोकांना 'चाणक्य नीति' या नावाने माहिती आहे. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. आज चाणक्य यांनी आपल्याला येत असलेल्या समस्यांचे कारण सांगितले आहे.
अधिक वाचा :पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ
समस्यांचे मूळ जे आहे त्याचे गीतामध्ये देखील वर्णन करण्यात आले आहे. समस्यांचे मूळ असलेली ही गोष्ट व्यक्तीला नरकात घेऊन जात असते. यामुळे व्यक्तीने या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. जर व्यक्तीने त्याचा त्याग केला तर मनुष्याच्या जीवनात सुख, शांती राहत असते.
अधिक वाचा : शनिश्चरी अमावस्या म्हणजे काय, कधी आहे ही अमावस्या?
श्लोकाद्वारे जाणून घेऊ व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचे कारण
यस्य स्नेहो भयं तस्य स्नेहो दुःखस्य भाजनम् ।
स्नेहमूलानि दुःखानि तानि त्यक्तवा वसेत्सुखम् ।।
चाणक्य म्हणतात की आसक्ती म्हणजेच मोह (लालसा) हे सर्व प्रकारच्या दुःखांचे मूळ आहे. मोह व्यक्तीचे अज्ञान वाढते आणि त्यामुळे जीवनात समस्या सुरू होतात.
अधिक वाचा : पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर
व्यक्ती मोहाच्या जाळ्यात अडकून माणूस आंधळा होतो. आपल्या हातातून काहीरी चूक होत असल्याची जाणीव होऊनही तो स्वतःला वाईट करण्यापासून रोखू शकत नाही. हेच त्याच्या दु:खाचे कारण आहे. महाभारतात, धृतराष्ट्र दुर्योधनावर इतका मोहित झाला होता की तो आपल्या मुलालाही चुकीच्या गोष्टींपासून रोखू शकला नाही आणि शेवटी कुटुंबाचा नाश झाला.
मानवी जीवनात पैसा, नातेसंबंध, वासना इत्यादींचा मोह माणसाला ध्येयप्राप्तीच्या मार्गापासून भरकटवतं असते. ध्येयापासून दूर जात असल्याने व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, जेव्हा कोणी मोह सोडतो तेव्हा त्याला माझी कृपा प्राप्त होते. आसक्ती मोह नसलेल्या व्यक्तीला परम आनंदाची प्राप्ती होते. गीतेमध्ये वासना, क्रोध आणि लोभ हे तीन प्रकारचे नरकाचे दरवाजे आहेत. जे मनुष्याला अधोगतीला घेऊन जातात त्यामुळे अशा काही व्यक्तींना एकटे सोडणे चांगले असते.