Chanakya Niti : चुकूनही करू नका ही कामे; नाहीतर लक्ष्मी माता होईल नाराज, येतील द्रारिद्याचे दिवस

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 16:47 IST

Chanakya Niti :चाणक्य नीती (Chanakya Niti ) म्हणते की धनाची देवी (Money) लक्ष्मीची (Lakshmi Goddess) कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा माणूस चांगल्या सवयी लावून जीवन जगतो.

Chanakya Niti
चाणक्य नीती   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अहंकार आणि नेहमी राग येणे हे अवगुण आहेत, यामुळे व्यक्तीच्या यशात अडथळा येत असतो.
  • जे लोक वाईट सवयींनी वेढलेले असतात, लक्ष्मी माता त्यांच्यावर नाराज होते.
  • लक्ष्मी मातेला स्वच्छता अधिक प्रिय असते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवले पाहिजे.

Chanakya Niti :नवी दिल्ली  :  चाणक्य नीती (Chanakya Niti ) म्हणते की धनाची देवी (Money) लक्ष्मीची (Lakshmi Goddess) कृपा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा माणूस चांगल्या सवयी लावून जीवन जगतो. जे लोक वाईट सवयींनी वेढलेले असतात, लक्ष्मी माता त्यांच्यावर नाराज होते त्यांना लवकरच सोडून जात असते. अशा लोकांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. या लोकांचे जीवनही दुःखाने भरलेले असते. 

लक्ष्मीजींना हे काम आवडत नाही 

चाणक्य नीती म्हणते की पैशाचा वापर इतरांचे नुकसान करण्यासाठी करू नये.  असे करणाऱ्यांवर लक्ष्मी मातेला लवकरच राग येत असतो. पैसा आला की पैशाचा योग्य वापर व्हायला हवा. जे अहंकार आणि ज्यांना राग लवकर येत असतो ते इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा वापर करतात. अशा लोकांना लक्ष्मी माता शिक्षा देते. त्यांच्यापासून कायमची निघून जात असते. खोटे बोलणारे लोक लक्ष्मी मातेला आवडत नाहीत.

स्वच्छतेचा सराव करा 

चाणक्य नीतीनुसार, जे स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत त्यांना लक्ष्मीजी आपला आशीर्वाद देत नाहीत. लक्ष्मी मातेला स्वच्छता अधिक प्रिय असते. त्यामुळेच स्वच्छतेची काळजी जेथे घेतली जात नाही अशा ठिकाणी लक्ष्मी माता राहत नाही. त्या घरातून लक्ष्मी माता निघून जात असते. 

अहंकारापासून दूर राहा  

चाणक्य नीती म्हणते की लक्ष्मीजींना अहंकारी आणि रागावलेले लोक आवडत नाहीत. चाणक्याने त्यांचे अवगुण म्हणून वर्णन केले आहे. जे एखाद्याच्या यशात अडथळा आणतात. या दोषांपासून दूर राहिले पाहिजे. अहंकारामुळे माणसाची सर्व प्रतिभा, क्षमता आणि प्रतिष्ठा नष्ट होते. लक्ष्मी माताही  अशा लोकांना सोडून निघून जात असते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी