चाणक्य नीती: जीवनात प्रगती करायची असेल तर विद्या आणि संगत आहे महत्त्वाची

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 11, 2021 | 08:05 IST

यश सगळ्यांना हवं असतं, त्याबद्दल अनेक जण चिंतेत असतात. अनेक यशाच्या गुरुकिल्ली सांगणारे असतात.

Chanakya Niti
चाणक्य नीती   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जीवनात यश त्यांनाच मिळतं जे विद्या ग्रहण करण्यास नेहमी तयार राहतात.
  • चांगल्या संगतीमुळे यशाचा मार्ग हा सुकर होत असतो.
  • फक्त सुशिक्षित होणं म्हणजे यश मिळवणं असं नाही.

मुंबई : यश सगळ्यांना हवं असतं, त्याबद्दल अनेक जण चिंतेत असतात. अनेक यशाच्या गुरुकिल्ली सांगणारे असतात. पण कोणत्या गोष्टी केल्याने आपला फायदा होईल याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. यासाठी शिक्षण कामी पडत असतं. दरम्यान आज जीवनातील प्रगतीसाठी संगत गुण कसा फायदा असतो किंवा प्रगतीमध्ये अडथळा कसा ठरू शकतो. याची माहिती आचार्य चाणक्यांनी सांगितली आहे.  

जीवनात यश त्यांनाच मिळतं जे विद्या ग्रहण करण्यास नेहमी तयार राहतात. विशेष म्हणजे शिक्षणासाठी वयाची अट नसते. विद्या मिळवण्यासाठी मनात आत्मविश्वास असला पाहिजे. जेव्हा व्यक्ती पूर्ण निश्चय करतो तेव्हा त्याला कोणची रोखू शकत नाही. 

संस्कार आणि संगतीचे महत्व

विद्येचं महत्त्व ही तेव्हाच आहे, जेव्हा संस्कार आणि संगत चांगली असेल. संस्कारामुळे विद्येचा कसा वापर कसा करायचा यांची प्रेरणा मिळते. चांगल्या संगतीमुळे यशाचा मार्ग हा सुकर होत असतो. आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, फक्त सुशिक्षित होणं म्हणजे यश मिळवणं असं नाही. आपल्या ज्ञानाचा इतर लोकांना काय आणि किती फायदा झाला यावर यश अवलंबून असते. समाजातील लोकांच्या कल्याण करण्याची भावना लक्षात ठेवून केलेलं कार्य सार्थक होत असतं. यामुळे राष्ट्र मजबूत होत असतं 

चांगल्या कामाचा परिणाम चांगला होत असतो

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, व्यक्तीने कष्ट करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. फळ काय मिळेल अथवा माझा काय फायदा याचा विचार न करता काम केलं पाहिजे. जर तुमचं काम चांगलं आहे तर त्याचा परिणाम हा चांगलाच होईल. मानव कल्याणासाठी नेहमी गंभीर राहीलं पाहिजे. जे पण कार्य कराल त्याचा दुसऱ्यांना किती फायदा होणार, यावर नेहमी चिंता केली पाहिजे. 

वाईट संगतीपासून दूर राहीलं पाहिजे

जाणकारांच्या मते व्यक्तीला आपल्या संगतीविषयी नेहमी सावध राहीलं पाहिजे. वाईट चांगतीमुळे प्रतिभाशाली व्यक्ती पम आपल्या प्रतिभेचा लाभ दुसऱ्यांना देऊ शकत नाही. यामुळे वाईट संगतीचा नेहमी त्याग केला पाहिजे. वाईट संगत आपल्या प्रतिभेचा नाश करत असते. वाईट संगत व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून दूर करत असते. दरम्यान वाईट संगत आपण आपल्या ज्ञानाने दूर देखील करू शकतो. व्यक्तीला वाईट गोष्टी लवकर आकर्षित करत असतात. जेव्हा तुम्हाला वाईट आणि चांगल्या गोष्टींचं ज्ञान असेल तर त्याच वेळी आपण वाईट गोष्टीपासून वाचू शकतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी