चाणक्य नीती: जीवनात 'या' गोष्टींमुळे येत असतं आर्थिक संकट

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 21, 2021 | 08:10 IST

आपल्याला आयुष्यात काही करायचं असेल तर वाईट सवयींपासून व्यक्तीने दूर राहीलं पाहिजे. वाईट सवयी यशाच्या मार्गतील अडथळा ठरत असतात.

Chanakya Niti
चाणक्य नीती   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वाईट गोष्टी चांगल्या गुणांही बाधक ठरत असतात.
  • वाईट सवयी किंवा चुकीच्या सवयी ह्या व्यक्तीला अपयश देत असतात.
  • नकारात्मकता पण यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे.

नवी दिल्ली : आपल्याला आयुष्यात काही करायचं असेल तर वाईट सवयींपासून व्यक्तीने दूर राहीलं पाहिजे. वाईट सवयी यशाच्या मार्गतील अडथळा ठरत असतात. शास्त्रात सांगण्यात आले की, वाईट कामांचे फळ वाईटच मिळत असते. यामुळे वाईट कामांपासून वाचलं पाहिजे. गीतेमध्ये अर्जुनला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणातात की, वाईट गोष्टी चांगल्या गुणांही बाधक ठरत असतात.

वाईटपणा व्यक्तीची प्रतिभा नष्ट करते. यामुळे व्यक्तीला कुठेच सन्मान मिळत नाही. व्यक्तीमधील वाईटपणा आणि चुकीचे गुण पाहून अनेकजण त्याच्यापासून दूर जात असतात. जाणकारांच्या मते, वाईट सवयी किंवा चुकीच्या सवयी ह्या व्यक्तीला अपयश देत असतात. असे लोक समाजात आदर मिळवू शकत नाहीत. यामुळे लक्ष्मी माताही घरातून आणि व्यक्तीपासून दूर जात असते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात दुख आणि आर्थिक संकटे येत असतात. यामुळे या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे..

धोका 

जे व्यक्ती आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याची फसवणूक करतात किंवा धोका देतात त्यांनी कधी सन्मान आदर मिळत नाही. धोका देणाऱ्या व्यक्तींचा खरा चेहरा इतरांपुढे येत असतो तेव्हा त्यांना मान खाली घालावी लागते. धोका देण्याची सवयीला सर्वात खराब सवय म्हटलं गेलं आहे, अशा लोकांचा कोणची विश्वास करत नाही.

पैशांची लालसा 

पैशाची लालसा किंवा धनाचा लोभी असू नये. पैसा मेहनत कष्ट करून कमवलं पाहिजे. जे लोक अनैतिक काम करून पैसे कमावतात त्यांच्या लक्ष्मी कधीच खूश नसते. फसवणूक करणाऱ्या लोकांना आयुष्यात अनेक आर्थिक संकटे येत असतात. 

नकारात्मकता 

नकारात्मकता पण यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक विचार नेहमी दूर ठेवले पाहिजे. जे व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करत असतात ते कधीच काही करू शकत नाहीत. आयुष्यात तुम्हाला यश हवे असेल तर नकारात्मकता सोडली पाहिजे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी