Chanakya Niti : महिलांनी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या काय सांगते चाणक्य निती?

Chanakya Niti For Women,  Desire Of Such Women Remains Unfulfilled Says Chanakya Niti : आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी महिलांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत चाणक्य नितीमध्ये काय नमूद केले आहे.

Chanakya Niti For Women
महिलांनी काय करावे आणि काय करू नये? काय सांगते चाणक्य निती?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महिलांनी काय करावे आणि काय करू नये?
  • काय सांगते चाणक्य निती?
  • चाणक्य निती म्हणजे काय?

Chanakya Niti For Women,  Desire Of Such Women Remains Unfulfilled Says Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते. आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी महिलांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत चाणक्य नितीमध्ये काय नमूद केले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की महिलांनी स्वावलंबी व्हावे. पुरुषांवर अवलंबून राहू नये. ज्या महिला पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहतात त्यांचे नुकसान होते. त्यांच्या सर्वच्या सर्व इच्छा आकांक्षा तसेच स्वप्न यांची पूर्तता होणे कठीण असते. कारण या महिलांना पुरुषांच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून राहावे लागते. पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून असलेल्या महिलांचे महत्त्व हळू हळू मर्यादीत होते किंवा कमी होते. क्षमता असूनही अशा महिला त्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करू शकत नाहीत. स्वतःला आजमावले नसल्यामुळे या महिला नकळत मानसिकदृष्ट्या कमकुवत होण्याचा धोका वाढतो. धनासाठी या महिला पुरुषांवर अवलंबून असतात. यामुळे वैयक्तिक आयुष्य कसे जगावे याचा निर्णय या महिला स्वतंत्रपणे घेण्यासाठी असमर्थ होत जातात. 

आचार्य चाणक्य यांच्या मते महिला अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा बुद्धिमान असतात. पुरुषांच्या तुलनेत जास्त धाडसी पण असतात.  पण त्यांनी आवश्यक शिक्षण घेऊन स्वावलंबी होणे टाळले असेल तर त्यांचे नुकसान होते. त्या गरजेच्यावेळी धाडसी कृती करण्यास धजावत नाहीत. 

कामुकतेच्या बाबतीतही महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण स्वतःला कमकुवत समजल्यामुळे महिला कामुकतेच्या बाबतीतही नकळत मागे पडतात असे आचार्य चाणक्य सांगतात. 

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय ।  या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

चाणक्य निती म्हणजे काय?

चाणक्य यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि  मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास प्रशिक्षित करून मगध जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. पुढे चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत महामंत्री झाले. चाणक्य हेच विष्णूगुप्त होते. त्यांना कौटिल्य या नावानेही ओळखले जात होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्य यांचा मुख्य सहभाग होता. 

चाणक्य यांनी रचलेला  कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक उत्तम ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यात 25 प्रकरणे आणि 6 हजार श्लोक आहेत. ग्रंथाद्वारे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण याबाबत मार्गदर्शन केले आहे. हा अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणारा पहिला मानवी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात नमूद निती ही चाणक्य निती किंवा दंड निती या नावाने ओळखली जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी