Chanakya Niti:आईच्या गर्भातूनच उदारता, मधुरता आणि धाडस मिळतं

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 12, 2021 | 08:33 IST

आचार्य चाणक्य व्यक्तीच्या आत्मसात गुणाविषयी बोलतांना म्हणतात की, जीवन संघर्षातील यश हे त्यावर अवंलबून असते.

Chanakya Niti
चाणक्य नीती   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ज्ञान- अनुभवाच्या आधारावर जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर आपण मात करू शकतो.
  • उदारता, मधुरता आणि धाडस हे गुण नाही मिळत कोणाकडून

नवी दिल्ली : आचार्य चाणक्य व्यक्तीच्या आत्मसात गुणाविषयी बोलतांना म्हणतात की, जीवन संघर्षातील यश हे त्यावर अवंलबून असते, जे गुण आपल्याला जन्मजात मिळत असतात. ज्ञान- अनुभवाच्या आधारावर जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर आपण मात करू शकतो. परंतु सुख-दुखात अविचलितपणा, धाडस, मधुरता आणि उदारता आपली असते. 
या गुणांमुळे व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होत असतो.

आचार्य चाणक्य पण म्हणतात की, धोक्यापेक्षा मोठा कोणतंच पाप नाही. हे पाप व्यक्तीला नष्ट करण्यास सक्षम आहे. जो व्यक्ती आपला समाज सोडून दुसरीकड जातो, त्याचा नाश असाच होतो जसा एखादा राजा अधर्मासह हा आपल्या प्रजेसाठी काळ बनून जातो. चाणक्य नीती म्हणते की, दिवा जरी अंधारापेक्षा छोटा वाटत असला तरी तो सर्व अंधारा संपवण्यास सक्षम असतो. त्याच प्रमाणे सदगुण आपल्यातील अवगुणाला नष्ट करत असतात. 

आचार्य चाणक्यांच्या मते, गुणवान व्यक्तीने सर्व काही दान केलं पाहिजे, जे त्याच्याकडे अधिक प्रमाणात आहे. आपण सर्वांना माहिती आहे की, कर्ण, बाली, आणि राजा विक्रमादित्य यांना त्यांच्या दानशूरपणामुळे आजही आठवलं जातं. नीतीशास्त्रानुसार, आज जगात तेच सुखी आहेत जे, सर्व नात्यांविषयी उदार आहेत. अपरिचित लोकांशी स्नेहाने चर्चा करतात. चांगल्या लोकांविषयी प्रेम व्यक्त करतात. शत्रूंसमोर धाडस दाखवतात आणि जेष्ठांसमोर विन्रमपण वागतात.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी