चाणक्य नीती : पहाटे उठून करा 'ही' कामे, तुमचा दिवस होईल चांगला; कामांमध्ये मिळेल यश

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 09, 2021 | 09:46 IST

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीचे गुण हेच तो वाईट आहे का चांगला हे दर्शवत असते. जे व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देतात,चुकीचे कामे करतात त्यांना समाज मान- पान मिळत नाही.

Chanakya Niti
चाणक्य नीती   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

 • चाणक्य नीती म्हणते, चांगल्या कामांनी दिवसाची सुरुवात केल्यास दिवस जाईल प्रसन्न
 • चांगले काम करणाऱ्यांना जीवनात यश मिळते.
 • सत्कर्म करण्यास माणसाने नेहमी तयार असावे.

मुंबई : चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीचे गुण हेच तो वाईट आहे का चांगला हे दर्शवत असते. जे व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देतात, चुकीचे कामे करतात त्यांना समाज मान- पान मिळत नाही. वेळ आली तर त्या व्यक्तींना त्याची शिक्षा मिळते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात की, व्यक्तीने चांगल्या गोष्टी करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. सत्कर्म काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली असेल तर वेळ न घालवता ते चांगले काम त्वरीत केलं पाहिजे.

जाणकारांच्या मते,  जे व्यक्ती चांगले कार्य करतात त्यांना समाजात नेहमी मान-पान, आदर मिळत असतो. चांगल्या कामासाठी पुढे येणारी लोकं हे समाजात चांगलं उदाहरण बनत असतात. चांगले गुण आत्मसात केले तर आपला आत्मविश्वास वाढत असतात. चांगले गुण व्यक्तीला योग्य समाज हित पूर्ण कामे करण्यास प्रेरित करत असतात. चांगल्या गोष्टी करणारा व्यक्ती नेहमी आपलं लक्ष्य मिळवत असतो, अशा लोकांना देवही नेहमी आशीर्वाद देत असतात.  

आत्मविश्वास असल्यास आपण कोणत्याही संकटाला  सामोरे जाऊ शकतो. आत्मविश्वास येण्यासाठी आपल्या शरिरात सकारात्मक ऊर्जा तयार झाली पाहिजे. सकाळी उठून हे कामे केल्यास तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल....

सकाळी उठल्यानंतर हे काम करावीत..

 • सूर्योदय  होण्यापूर्वीच आपण आपला बिछाना सोडावा. 
 • निसर्गाला धन्यवाद द्या. 
 • पहाटे उठल्यानंतर आपण आपली दोन्ही तळहात पाहावे. 
 • त्यानंतर धरती मातेला वंदन करावे. 
 • आई- वडिलांचा आशीर्वाद  घेतला पाहिजे. त्यांच्या पाया पडले पाहिजेत.
 • अंघोळ केल्यानंतर देवांची पूजा आणि अर्चना केली पाहिजे. 
 • सूर्य देवाला पाणी अर्पण करावे. 
 • त्यानंतर तुमचे इतर कामे करावीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी