Chanakya Niti: कोंबडा, कावळा अन् बगळा पक्ष्यांचे 'हे' गुण माणसांनी घेतले तर जीवनात मिळेल मोठं यश

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 14, 2022 | 10:12 IST

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे जीवन हे सोपं नसतं.  संकटाच्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाचे शिखर गाठायचे असते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर तो इतर आदर्श व्यक्तींकडून आपण काही गुण आत्मसात करू शकतो.

 Chanakya Niti
जीवनात यश हवे तर कावळा, कोंबड्याचे 'हे' गुण करा आत्मसात   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी कावळ्यांचे वर्णन अतिशय हुशार आणि बुद्धिमान पक्षी म्हणून केले आहे.
  • माणसाने आपल्या सर्व इंद्रियांवर बगळाप्रमाणे नियंत्रण ठेवले पाहिजे.
  • कोंबडा मानवाला त्यांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहून अडचणींचा सामना करायला शिकवत असतो.

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनाच्या प्रत्येक वळणावर लोकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करते. जीवन जगण्याची पद्धत सांगण्यासोबतच अपयशाचे यशात रूपांतर करण्याचा मार्गही सांगते. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे जीवन हे सोपं नसतं.  संकटाच्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाचे शिखर गाठायचे असते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर तो इतर आदर्श व्यक्तींकडून आपण काही गुण आत्मसात करू शकतो. परंतु फक्त माणसांकडूनच आपल्याला हे गुण मिळतात असे नाही तर पक्षी प्राण्यांकडूनही आपण काही गुण घेऊ शकतो.   (Chanakya Niti: If people take the qualities of rooster, crow and heron, they will get great success in life)

अधिक वाचा  : घरातून बाहेर पडताना या चमत्कारी मंत्राचा नक्की करा जप...

असे अनेक पक्षी आहेत जे व्यक्तीच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या विशेष गुणांपासून प्रेरणा घेऊन आपण मोठ्या अडचणीवरही सहज मात करू शकतो. दरम्यान आचार्य चाणक्य यांनी अशा तीन पक्ष्यांचा उल्लेख केला आहे. चला तर जाणून घेऊ कोणते पक्षी आहेत जे आपल्याला यशाचे शिखर गाठण्यास मदत करत असतात. 

कावळा 

 तुच्छ किंवा हिणवण्याच्या उद्देशाने कावळा हा शब्द वापरत असतो. अशुद्ध काळात कावळाचे महत्त्व वाढत असते. पण वाचकांनो तुम्हाला माहिती आहे का, कावळा या पक्ष्याकडे असे काही गुण आहेत जे मानवाला यशस्वी बनवण्यास मदत करत असतात. 

अधिक वाचा  : भारत वि. बांगलादेश पहिली टेस्ट, कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

आचार्य चाणक्य यांनी कावळ्यांचे वर्णन अतिशय हुशार आणि बुद्धिमान पक्षी म्हणून केले आहे. आचार्य म्हणतात की कावळा ज्या प्रकारे सदैव सतर्क आणि सावध असतो, त्याचप्रमाणे माणसाने नेहमी सावध राहिले पाहिजे. कावळा आपल्या कामात यश मिळवण्यासाठी न घाबरता पूर्ण इच्छाशक्तीने चिकाटीने प्रयत्न करतो आणि यश मिळवतो. कावळ्याचा हा गुण आपण आत्मसात केला तर  माणूसही यशस्वी होऊ शकतो.

बगळा

आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाने आपल्या सर्व इंद्रियांवर बगळाप्रमाणे नियंत्रण ठेवले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण नसेल तर तो कधीही कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही. अन्नाच्या शोधात एक बगळा ज्या प्रकारे तासनतास आपले लक्ष एका जागी एकवटून उभा राहतो. त्या इच्छाशक्ती आणि क्षमतेनुसार कोणतेही काम केल्यास यश निश्चितच मिळते.

अधिक वाचा  : Nashik Crimeराष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

कोंबडा 

आचार्य चाणक्य म्हणतात की कोंबडासुद्धा माणसाला खूप ज्ञान देते असतो. जसा कोंबडा नेहमी सूर्योदयापूर्वी उगवतो, त्याचप्रमाणे माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे. याशिवाय कोंबडा मानवाला त्यांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहून अडचणींचा सामना करायला शिकवत असतो. कोंबड्याच्या या विशेष गुणांमुळे अपयशाचेही यशात रूपांतर करता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी