चाणक्य नीती : आयुष्यात यश हवं असेल तर चुकून पण करू नका 'हे' काम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 08, 2021 | 08:49 IST

माणूस यश मिळवण्यासाठी मोठं शर्तीचे प्रयत्न करत असतो. पण यश मिळवत असताना काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं असतं.

 Chanakya Niti  If you want success in life, don't do it by mistake
आयुष्यात यश हवं असेल तर चुकून पण करू नका 'हे' काम  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • यश मिळवण्यासाठी कष्ट करणं आवश्यक असतं
  • नकारात्मक विचार केल्यास यश मिळत नाही.
  • गंभीरता आणि धैर्य सोडू नये.

मुंबई : माणूस यश मिळवण्यासाठी मोठं शर्तीचे प्रयत्न करत असतो. पण यश मिळवत असताना काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं असतं. कधी-कधी छोट्या- छोट्या चुकींमुळे यश आपल्यापासून दूर जात असतं. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण  म्हणतात की, व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य बनवून ठेवलं पाहिजं. जे व्यक्ती संकट आणि आनंदाच्या काळात धैर्य आणि गंभीरता सोडत असतात. ते प्रतिभाशाली असल्यानंतरही यश मिळवू शकत नाहीत.  

जाणकारांच्या मते, यश त्यांनाच मिळतं जे लोक प्रत्येक परिस्थितीत शांत राहतात. म्हणजेच दु:खात अधिक दु:खी होण्याने काही मिळत नाही. दु:खाच्या वेळी व्यक्तीची खरी परीक्षा होत असते. अशावेळी धैर्य कधीही सोडू नये. संकटाच्या वेळी आपल्यात असलेल्या गुणाचं आकलन होत असतं. जे लोक या गोष्टी समजू शकत नाही, त्यांना नुकसान होत असते.   

परिश्रमाच महत्त्व

यशात कष्टाचं मोठं योगदान असतं. जे व्यक्ती कष्ट करण्यास घाबरतात. किंवा मेहनत घेण्यापासून वाचतात, ते कधीच यश मिळवू शकत नाहीत. समजा त्यांना यश मिळाले तरी ते जास्त वेळ यश टिकवू शकत नाहीत. यामुळे मेहनत केली पाहिजे.

शिस्त लावा

चाणक्या नीती म्हणते की, व्यक्तीला आपल्या जीवनात शिस्त ठेवणं आवश्यक असतं. ज्या व्यक्तीच्या जीवनात शिस्त नाही आहे, त्यांना यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याच ठिकाणी जे लोक शिस्तीचे पालन करतात ते लोक लवकर यशाला गवसणी घालतात.   

नकारात्मक विचारांना दूर ठेवा

जाणकरांच्य मते, व्यक्तीच्या यशात सकारात्मक विचारांचं मोठं योगदान असतं. जे व्यक्ती नकारात्मक विचारांचा विचार करत असतात. त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळत नाही. असे लोक खऱ्या सुखापासून वंचित राहत असतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी