Chanakya Niti in Marathi, acharya chanakya told which 4 things to keep in mind while buying a house : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य निती सांगितली आहे. या मार्गदर्शनातून त्यांनी जीवनात यशस्वी, आनंदी, सुखी कसे व्हावे याविषयी टिप्स दिल्या आहेत. व्यवहार, करिअर, दांपत्य जीवन, कौटुंबिक जीवन अशा वेगवगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन एवढी वर्षे झाली तरी आजही उपयुक्त असल्याचे मत अनेक अभ्यासक आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
कामाच्या व्यापातून बाहेर पडल्यावर परतण्यासाठी हक्काचे घर हवे. कुटुंबासोबत निवांत वेळ घालविण्यासाठी हक्काचे घर हवे. सुखी, समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठीही हक्काचे घर हवे, असे आचार्य चाणक्या सांगतात. आयुष्याचा अविभाज्य घटक असलेले हे घर खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असेही आचार्य चाणक्य सांगतात.
घर खरेदी करणे अथवा एखादा भूखंड खरेदी करून वा आधीपासून स्वतःच्या मालकीच्या असलेल्या एखाद्या भूखंडावर घर बांधून राहणे शक्य आहे. घरासाठी जागा निवडताना 4 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या बाबींचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे; असे आचार्य चाणक्य सांगतात.
सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकांची वस्ती असलेल्या भागात आपले घर असणे कौटुंबिक सुखासाठी आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. शेजारी हुशार, तज्ज्ञ मंडळी वास्तव्यास असतील त्यांच्याकडून अडचणीच्यावेळी मदत घेणे वा त्यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते. शेजारी आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील तर आर्थिक अडचणीच्या वेळी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेणे शक्य होईल. पण ही मदत शक्य तितक्या लवकर परत केली तर शेजाऱ्यांसमोर आपल्याला मिळणारा मान अबाधीत राहतो; असे आचार्य चाणक्य सांगतात.
ज्या परिसरात घर घेत आहात त्या परिसरातील प्रशासन उत्तमरित्या काम करत आहे का, परिसर स्वच्छ आहे का, परिसराची शोभा वाढविण्यासाठी आसपास कलात्मक रचना, उद्यान आदी सोयीसुविधा आहेत का या प्रश्नांची उत्तरं आधी जाणून घ्या. जर उत्तर हो असे असेल तर संबंधित परिसरात घर घेणे हिताचे ठरेल, असे आचार्य चाणक्य सांगतात.
Chanakya Niti: बायका 'हे; काम करत असतील पुरुष गड्यांनी लगेच दुसरीकडे फिरवावे आपले डोळे
पाण्याचा पुरवठा न थांबता सुरू राहणे आवश्यक आहे. पाणी जीवनावश्यक घटक आहे. कपडे धुणे, भांडी धुणे, स्वच्छता, पशूपक्ष्यांची तहान भागवणे अशा अनेक कामांसाठी पाणी लागते. यामुळे ज्या भागात पाणी प्रश्न, पाण्याचा पुरवठा न थांबता सुरळीत सुरू आहे त्या ठिकाणी घर घेणे हिताचे ठरेल, असे आचार्य चाणक्य सांगतात.
घर खरेदी करताना किंवा घर बांधताना परिसराची निवड जास्त महत्त्वाची आहे. जर घराजवळ वैद्यकीय सुविधा असतील तर घरात कोणीही आजारी पडल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार घेणे शक्य होईल. आपल्या मुलांना उज्ज्वल भवितव्य लाभावे यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. कुटुंबातील मुलं, तरुण चांगल्या शिक्षणसंस्थेत जाऊन शिकले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. यासाठीच घर घेताना जवळ उत्तम शिक्षणसंस्था असतील असे बघणे हिताचे असल्याचे आचार्य चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनी पण ओळखले जात होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले तत्वज्ञान हे चाणक्य निती या नावाने प्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक ग्रंथ लिहिले. यात नीतीशास्त्रावरील ग्रंथ पण प्रसिद्ध आहे. हाच ग्रंथ चाणक्य निती या नावानेही ओळखला जातो. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी ग्रंथात मार्गदर्शन आहे.
Disclaimer / डिस्क्लेमर : हा संकलित मजकूर आहे. Times Now Marathi याची जबाबदारी घेत नाही.