Chanakya Niti in Marathi, acharya chanakya told which three things should not share with anyone : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य निती सांगितली आहे. या मार्गदर्शनातून त्यांनी जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी टिप्स दिल्या आहेत. करिअर, दांपत्य जीवन, कौटुंबिक जीवन अशा वेगवगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन एवढी वर्षे झाली तरी आजही
उपयुक्त असल्याचे मत अनेक अभ्यासक आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
जीवनात यशस्वी होण्यासाठी 3 बाबी भाऊ, मित्र किंवा इतर कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात.
आपले उत्पन्न किती, खर्च किती, आपल्यावर कर्जाचा भार किती, आदी स्वतःच्या आर्थिक स्थितीची माहिती भाऊ, मित्र किंवा इतर कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात. आपल्या आर्थिक स्थितीची माहिती मिळाल्यावर काही जण इर्षेने तर काही जण लुटण्याच्या हेतूने आपल्या विरोधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काही हालचाली करण्याची शक्यता आहे. आपल्या आर्थिक स्थितीची माहिती मिळाल्यावर नाती तुटण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी स्वतःच्या आर्थिक स्थितीची माहिती कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात.
दांपत्य जीवन हा खासगी विषय आहे. या संदर्भात भाऊ, मित्र किंवा इतर कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात. आपल्या दांपत्य जीवनाबाबतची माहिती मिळाल्यावर या माहितीचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी दांपत्य जीवनाबाबतची माहिती कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात.
आपली आयुष्यात कधीतरी कळत नकळतपणे फसवणूक झाली असू शकते. या फसवणुकीबाबत भाऊ, मित्र किंवा इतर कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात. फसवणुकीची माहिती मिळाल्यावर या माहितीचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी फसवणुकीबाबतची माहिती कोणालाही सांगू नका असे आचार्य चाणक्य सांगतात.
Chanakya Niti: पुरुषांच्या या तीन सवयी पाहून महिला होत असतात घायाळ, लगेच करू लागतात जवळीक
आचार्य चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनी पण ओळखले जात होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले तत्वज्ञान हे चाणक्य निती या नावाने प्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक ग्रंथ लिहिले. यात नीतीशास्त्रावरील ग्रंथ पण प्रसिद्ध आहे. हाच ग्रंथ चाणक्य निती या नावानेही ओळखला जातो. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी ग्रंथात मार्गदर्शन आहे.
Disclaimer / डिस्क्लेमर : हा संकलित मजकूर आहे. Times Now Marathi याची जबाबदारी घेत नाही.