Chanakya Niti in Marathi: चाणक्य नीतिमध्ये (Chanakya Niti)मानवी आयुष्यातील (life) अडचणी सोडवण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित अशी अनेक माहिती दिली आहे, जी जीवनातील अनेक रहस्ये सोडवण्याचा मार्ग दाखवण्यासोबतच यशाचा मार्ग दाखवते. आचार्य चाणक्यांनी आपल्या ज्ञानाने (knowledge) सामान्य माणसाचे जीवन सुकर बनवले आहे.चाणक्यांच्या बुद्धीमत्ता आणि ज्ञानाविषयी आपण सर्वजण जाणून आहात. चाणक्यांची नीति लोकांना जीवनातील व्यावहारिक समज शिकवते. त्यांनी आपल्या नीतिमध्ये माणूस, महिला यांच्या स्वभावाविषयी मार्गदर्शन केलं आहे. नवरा-बायकोचं नाते कसे असावे, नातेसंबंध कसे टिकवावेत याविषयीही चाणक्यांनी मार्गदर्शन केलं आहे. माणसाचे जीवन कसे असावे याबाबतचं ज्ञान त्यांनी आपल्या चाणक्य नीतिशास्त्रात दिले आहे. (Chanakya Niti : Keep these things in mind while choosing a partner for marriage)
अधिक वाचा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक
सध्या लग्न जुळवा-जुळवीचे कार्यक्रम चालू आहेत. मुली-मुलं पाहण्याचा कार्यक्रम हा अनेकांच्या घरात होत आहे. या कार्यक्रमात आपण मुलीच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा मुलांचे कोणते गुण मुलींनी लक्षात घेतले पाहिजे याची समज असणं आवश्यक असते. आचार्य चाणक्यांनी जीवन साथीदार निवडताना काय गोष्टी आपल्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत याचे मार्गदर्शन आपल्या चाणक्य नीतिद्वारे केले आहे.
आचार्य म्हणतात की विवाह हा देखील मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नासाठी जीवनसाथी निवडणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. स्त्री असो वा पुरूष त्यांचा जीवनसाथीदार हा दुर्गुणाचा धनी असेल तर त्यांचे संपूर्ण आयुष्य नरक बनत असते. म्हणूनच जीवनसाथी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.
आचार्य चाणक्य म्हणतात की, कुणाच्या दबावाखाली लग्न करू नये. यासोबतच असा जीवनसाथी कधीही निवडू नये, जो कोणाच्या तरी दबावाखाली लग्नासाठी तयार होत असेल. कारण असा जीवनसाथीदार हा भविष्यात ना प्रेम देऊ शकतो ना आनंद देऊ शकतो. दबावाखाली लग्न करणारी व्यक्ती नेहमीच या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो.
अधिक वाचा : आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्ये
आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनसाथी निवडताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य पाहूनच लग्न करू नये. जे केवळ सौंदर्य पाहून जीवन साथीदार निवडतात, त्यांचे आयुष्य पुढे नरक बनते. कारण सौंदर्यामागे अनेक वाईट गुणही लपलेले असू शकतात. म्हणूनच लग्नाच्या वेळी जीवन साथीदार निवडताना स्त्री-पुरुषांनी आपली संस्कृती आणि शिक्षण याकडे पाहिले पाहिजे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवन साथीदार आयुष्यभर एकमेकांसोबत राहतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचे मूल्यमापन केले पाहिजे. जोडीदार निवडताना त्याच्यात किती संयम आहे हे बघायला हवे. कारण धीर धरणारेच जीवनातील चढउतारांना सामोरे जाऊ शकतात. त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे ते देखील पहा. गोड बोलणारा व्यक्ती हा कुटुंबाला आनंदी ठेवत असतो.