Chanakya Niti : मुलांसमोर करू नका 'ही' कृती

chanakya niti never do this work in front of children, parenting tips in marathi : मुलांवर चांगले संस्कार केल्यास त्यांच्यातून चांगला माणूस घडतो. एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती होते. यासाठीच मुले अवतीभोवती असताना पालकांनी जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आचार्य चाणक्य सांगतात. 

Chanakya Niti
मुलांसमोर करू नका 'ही' कृती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Chanakya Niti : मुलांसमोर करू नका 'ही' कृती
  • मुलांवर चांगले संस्कार करावे
  • मुलं अवतीभोवती असताना चुकीचे वर्तन करणे टाळावे

chanakya niti never do this work in front of children, parenting tips in marathi : आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते. आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी मुलांसमोर काय करावे आणि काय करू नये याबाबत चाणक्य नितीमध्ये काय नमूद केले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की अनेकजण यशस्वी झालेली व्यक्ती जसे वागली तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रकारचे अंधानुकरण करणे टाळावे. आपले सामर्थ्य ओळखून त्याचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे. 

मुलांसमोर कधीही कोणावर संतापू नये. मुलांसमोर अपशब्द उच्चारू नये. मुलांसमोर खोटं बोलू नये. मुलांसमोर व्यसन करू नये. मुलांसमोर कधीही कोणाचा अपमान करू नये; असे आचार्य चाणक्य सांगतात.

तब्येतीची काळजी घेण्याची आणि वैयक्तिक स्वच्छतेची सवय मुलांना लावावी. खरं बोलण्याची आणि कष्ट करून एखादी गोष्ट मिळवण्याची सवय मुलांना लावावी. दररोज अभ्यास पूर्ण करण्याची सवय मुलांच्या अंगी बाणवावी. मुलांवर त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करण्याचा संस्कार करावा. याचा मुलांना आयुष्यभर फायदा होतो, असे आचार्य चाणक्य सांगतात. 

मुलं चटकन अनुकरण करतात. चांगल्यापेक्षा वाईट कृतीचे अनुकरण वेगाने करतात. ही बाब लक्षात ठेवून पालकांनी मुलं अवतीभोवती असताना चुकीचे वर्तन करणे टाळावे. 

मुलांवर चांगले संस्कार केल्यास त्यांच्यातून चांगला माणूस घडतो. एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती होते. यासाठीच मुले अवतीभोवती असताना पालकांनी जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आचार्य चाणक्य सांगतात. 

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

चाणक्य निती म्हणजे काय?

चाणक्य यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि  मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास प्रशिक्षित करून मगध जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. पुढे चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत महामंत्री झाले. चाणक्य हेच विष्णूगुप्त होते. त्यांना कौटिल्य या नावानेही ओळखले जात होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्य यांचा मुख्य सहभाग होता. 

चाणक्य यांनी रचलेला  कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक उत्तम ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यात 25 प्रकरणे आणि 6 हजार श्लोक आहेत. ग्रंथाद्वारे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण याबाबत मार्गदर्शन केले आहे. हा अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणारा पहिला मानवी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात नमूद निती ही चाणक्य निती किंवा दंड निती या नावाने ओळखली जाते. 

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी