Chanakya Niti: पैसे कमवण्याच्या नादात कधीही विसरू नका या 3 गोष्टी, नाहीतर श्रीमंत माणूसही होतो कंगाल

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 15, 2022 | 13:54 IST

पैसा माणसाला राजापासून ते गरीब बनवत असतो तर कधी गरीब व्यक्तीला ते श्रीमंत बनवू शकतो. आचार्य चाणक्यांनी पैशाच्या संदर्भात एक महत्त्वाची नीती सांगितली आहे. पैसा असेल तर एखादी व्यक्ती त्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो आणि स्वतःची तसेच त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्यास सक्षम असतो. पण अधिक पैसा झाला तर माणसाच्या डोक्यात जेव्हा अहंकार येतो तेव्हा तो तुम्हाला आकाशावरुन जमिनीवर आणू शकतो.

Chanakya Niti: Never forget these 3 things in the name of making money
पैसे कमवण्याच्या नादात कधीही विसरू नका या 3 गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तुम्ही कितीही श्रीमंत असाल पण जर कोणी तुमच्यावर प्रेम करत नसेल, नाते जोडू इच्छित नसेल तर तुमच्यापेक्षा गरीब कोणी नाही.- चाणक्य
  • नाती जपायची असतील तर त्यात पैशाला कधीच मध्ये आणू नये.
  • जर कोणी पैसा कमावण्याच्या नादात धर्माचा त्याग केला तर अशा लोकांची समाजात प्रतिष्ठा कमी होत जाते.- चाणक्य

Chanakya Niti: पैसा माणसाला राजापासून ते गरीब बनवत असतो तर कधी गरीब व्यक्तीला ते श्रीमंत बनवू शकतो. आचार्य चाणक्यांनी पैशाच्या संदर्भात एक महत्त्वाची नीती सांगितली आहे. पैसा असेल तर एखादी व्यक्ती त्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो आणि स्वतःची तसेच त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्यास सक्षम असतो. पण अधिक पैसा झाला तर माणसाच्या डोक्यात जेव्हा अहंकार येतो तेव्हा तो तुम्हाला आकाशावरुन जमिनीवर आणू शकतो.

हाताने हरवलेला किंवा नुकसानीत गमावलेला पैसा पुन्हा कमावता येतो, पण पैसे मिळवण्याच्या नादात जर  या तीन गोष्टी गमावल्या असतील तर त्या परत मिळणे खूप कठीण असते. अशा स्थितीत श्रीमंत माणूसही लोकांच्या नजरेत गरीब होत असतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात म्हटले आहे की, 3 गोष्टी पैशापेक्षा जास्त आहेत.

या 3 गोष्टी तुम्हाला राजा बनवतात, जर गमावल्या तर भिकारी बनवत असतात

प्रेम

पैसा आणि प्रेम हे दोन्ही शब्द नक्कीच छोटे आहेत, पण या दोन शब्दांचा अर्थ खूप वेगळा आहे. काहीजण आपले कुटुंब सोडून पैशावर प्रेम करतात, तर काही प्रेमासाठी आपली संपत्ती नाकारतात. असं म्हणतात की, प्रेमासमोर जगातील संपत्ती फिकी पडत असते. चाणक्याच्या मते पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. नाती जपायची असतील तर त्यात पैशाला कधीच मध्ये आणू नये. नात्यांसमोर पैशाला किंमत नसते. तुम्ही कितीही श्रीमंत असाल पण जर कोणी तुमच्यावर प्रेम करत नसेल, नाते जोडू इच्छित नसेल तर तुमच्यापेक्षा गरीब कोणी नाही.

धर्म

धर्म हा नेहमी पैशाच्या वर ठेवला पाहिजे. धर्मच माणसाला बरोबर आणि चूक ओळखायला मदत करतो. चाणक्‍याच्या मते, जर कोणी पैसा कमावण्याच्या नादात धर्माचा त्याग केला तर अशा लोकांची समाजात प्रतिष्ठा कमी होत जाते. ती व्यक्ती लवकरच वाईट मार्गावर चालू लागते आणि लोकांच्या द्वेषाची शिकार बनते.

स्वाभिमान

स्वाभिमान आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो. माणूस आपल्या मेहनतीने पुन्हा पैसा कमवू शकतो, पण स्वाभिमान गेला तर तो परत मिळवणे फार कठीण आहे. स्वाभिमानासाठी पैशाचा त्याग करावा लागला तरी मागे हटू नका, याद्वारे तुम्ही चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीचा आदर्श निर्माण कराल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी