Chanakya Niti For Wealth: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य यांची समज आणि दूरदृष्टी यावरुन ओळखता येते की त्यांनी शतकांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या युगातही प्रासंगिक आहेत. चाणक्य नीतिमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जीवन (life) जगण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आनंदी आणि यशस्वी जीवन ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, पण या दोन गोष्टी मिळवण्यासाठी खूप मेहनत (hard work) करावी लागते. आचार्य चाणक्यांनी प्रगती साधण्यासाठी अनेक रहस्ये सांगितली आहेत, ज्यांना ते कळले, त्यांना अपयश कधीच येऊ शकत नाही. चाणक्य नीति ही मानवी समाजातील प्रत्येक घटकाचे व्यावहारिक शिक्षण देते. दरम्यान नीतिमध्ये यशस्वी जीवनाची पाच रहस्ये आचार्यांनी सांगितले आहेत. ते आपण जाणून घेऊ. (Chanakya Niti :'These' 5 things are the secret of personal progress)
चाणक्याने जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याविषयी सांगितले आहे. जे यश मिळविण्याच्या शर्यतीत महत्वाचे ठरतात. आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्तीने प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक काम करण्यासाठी योग्य वेळेची आणि योग्य ठिकाणाची वाट बघितली पाहिजे.
अधिक वाचा : Cyclone News : महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?
वेळेचे मूल्य ही यशाची पहिली पायरी आहे. जो व्यक्ती वेळेचे महत्त्व जाणून असतो तो आपल्या जीवनात यशस्वी होत असतो. कारण योग्य वेळी केलेले कर्म सदैव फलदायी असते. व्यक्तीने नेहमी त्या ठिकाणी राहावे जिथे त्याच्या रोजगाराची पुरेशी साधने असतील.
एखाद्या व्यक्तीच्या यशात मित्रांचा महत्त्वाचा वाटा असतो, पण माणसाला खरा मित्र ओळखणे खूप महत्त्वाचे असते. खरा मित्र तुम्हाला संकटातून बाहेर काढायला मदत करतोच पण तुमच्या मताला बरोबर आणि चुकीला चुकीचे सांगण्याची ताकदही ठेवत असतो. यामुळे तुमच्या खर्या आणि चांगल्या मित्राला कधीही तुमच्यापासून दूर ठेवू नका, परिस्थिती कशीही असो. तुमच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी ते उपयुक्त ठरत असतात.
अधिक वाचा : विधानसभा निवडणूक निकाल
आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीने कधीही त्याच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये. उदरनिर्वाहासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण पैसा मिळवण्यासाठी कधीही आपली क्षमता पणाला लावू नका. माणसाने प्रामाणिकपणे पैसे कमवले पाहिजेत आणि बचत करण्यापासून गुंतवणुकीपर्यंत काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
पैसे कमावण्यासोबत बचत करणे खूप महत्वाचे आहे. जो माणूस वाईट वेळेला वाचवत नाही त्याला मुर्ख म्हणतात, त्याला कालांतराने संकटांना सामोरे जावे लागते. दरम्यान माणूस केवळ त्याच्या कौशल्याने आणि मेहनतीने उंची गाठतो. यासोबतच माणसाला त्याची ताकद आणि कमकुवतपणा या दोन्हीची जाणीव असणे आवश्यक आहे.