चाणक्य नीती : 'या' सवयींमुळे नाही मिळत आदर, लक्ष्मी माता पण असते नाराज

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 19, 2021 | 07:43 IST

समाजातील प्रत्येक माणसाला आदर मिळणं आवश्यक असतं. मग तो व्यक्ती मोठा, किंवा छोट्या असो. पुरुष असो किंवा महिला. सर्वांना आदर हवा असतो.

Chanakya Niti
'या' सवयींमुळे नाही मिळत आदर, लक्ष्मी माता पण असते नाराज   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वाईट वर्तनामुळे व्यक्तीचा आदर कमी होत असतो.
  • वाईट वर्तनापासून वाचण्यासाठी व्यक्तीने श्रेष्ठ गुणांचा चांगला गुणांचा अवलंब केला पाहिजे.
  • चुकीच्या सवयींमुळे व्यक्तीला नेहमी नुकसान होत असतं.

नवी दिल्ली : समाजातील प्रत्येक माणसाला आदर मिळणं आवश्यक असतं. मग तो व्यक्ती मोठा, किंवा छोट्या असो. पुरुष असो किंवा महिला. सर्वांना आदर हवा असतो. समाजात आपल्यला आदर मिळावा यासाठी व्यक्ती नेहमी व्याकूळ असतो. पण चार चौघात आदर मिळाला नाही तर अनेकजण बेचैन होत असतात. यामुळे काही गोष्टीची दक्षता घेतली किंवा काय केल्याने आपल्याला सर्व ठिकाणी आदर मिळेल, याची जाण ठेवली पाहिजे.  

माणसाने कधीच चुकीच्या गोष्टी करू नये. वाईट वर्तनामुळे व्यक्तीचा आदर कमी होत असतो. त्याचबरोवर त्या व्यक्तीवर लक्ष्मी माता पण नाराज राहत असते. गीतेच्या उपदेशात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, चुकीच्या वर्तनापासून आपण वाचलं पाहिजे. वाईट वर्तनापासून वाचण्यासाठी व्यक्तीने श्रेष्ठ गुणांचा चांगला गुणांचा अवलंब केला पाहिजे. याचबरोबर जो व्यक्ती ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे. ज्ञान आणि सदाचार व्यक्तीच्या जीवनात यश आणत असतात. यामुळे व्यक्तीने नेहमी चांगले गुण आणि ज्ञान आत्मसात करावे.
जाणकारांच्या मते, चुकीच्या सवयींमुळे व्यक्तीला नेहमी नुकसान होत असतं. शास्त्रात सांगण्यात आले आहे की, सदाचारामुळे व्यक्तीला प्रत्येक जागी आदर आणि सन्मान मिळत असतो. असे लोक समजाला दिशा दाखवण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. यामुळे समाजात त्यांची स्तृती केली जाते. परंतु तेच लोक चुकीच्या सवयी आत्मसात करतात तेव्हा ते अपयशी होत असतात.  

आचार्य चाणक्य याविषयी म्हणतात की, व्यक्तीने कोणाचा वाईटपणा सांगू नये. दुसऱ्यांचा वाईटपणा सांगणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा अधिक असतो. अशा व्यक्तींशी आपण मैत्री केली किंवा संगत केली तर चांगल्या विचारांची व्यक्तीदेखील नकारात्मक गुणांनी प्रभावित होत असते. यामुळे अशा व्यक्तींपासून आपण वाचलं पाहिजे. कोणत्याच प्रकारची नकारात्मकता जीवनात चांगलं फळ देत नाही. याचबरोबर व्यक्तीने क्रोध करू नये. गीतेमध्ये क्रोधाला माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानलं गेलं आहे. जे लोक नेहमी क्रोधात असतात, त्यांच्याशी मैत्री करण्यास कोणी तयार नसतो. राग पकडणारे व्यक्ती आनंदी राहू शकत नाहीत. लक्ष्मी माताही त्यांच्यावर नाराज राहत असते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी