Chanakya Niti: मानवाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत या तीन गोष्टी, मिळाल्यातर आयुष्य होत सुंदर

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 25, 2022 | 10:03 IST

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी चाणक्य नीतिमध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूचे मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात जीवन जगण्याच्या कलेविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. जीवनाशी (life) निगडित प्रत्येक पैलूचा उल्लेख करून आचार्य यांनी आपल्या धोरणांतून आणि श्लोकांतून समस्या दूर करण्याचे अनेक मार्गही सांगितले आहेत.

Chanakya Niti
मानवाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत 'या' तीन गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आपले जीवन सुखकारक व्हावे यासाठी आचार्य चाणक्यांनी खूप मार्गदर्शन केले आहे.
  • व्यक्तीच्या जीवनात तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
  • जे व्यक्ती धर्म- कर्म- नैतिक गुणांनी परिपूर्ण असतात. तेच लोक खरे मानव असतात.

Chanakya Niti: आपले जीवन सुखकारक व्हावे यासाठी आचार्य चाणक्यांनी खूप मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य  यांनी त्यांच्या नीतिशास्त्र  ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य यांची समज आणि दूरदृष्टी किती मोठी होती हे ओळखणं सहज सोपं आहे. आचार्यांनी काही शतकांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या युगातही प्रासंगिक आहेत. यावरुन ते किती ज्ञानी होते हे समजते. चाणक्य नीति लोकांना जीवनात  (life) यश मिळवण्याचा मार्ग सांगण्यासोबतच नात्यांसंबंधीच्या समस्या सोडवण्यातही मदत करत असते. (Chanakya Niti: These three things are important in human life)

अधिक वाचा  :  कोरोनामुळे भारत सरकार सतर्क, पत्र लिहून राज्यांना सूचना

चाणक्यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की, व्यक्तीच्या जीवनात तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जर व्यक्तीला वेळेवर आणि लवकर मिळाल्या तर त्याचे जीवन त्याला स्वर्ग वाटत असते. आता या तीन गोष्टी काय आहेत हे जाणून घेण्याची इच्छा आमच्यासह तुम्हालाही असेल. चला तर या गोष्टी आपण जाणून घेऊ.

अधिक वाचा  :  तरुण संतविचारांकडे कसं पाहतात, याचा अभ्यास महत्त्वाचा

प्रत्येक मनुष्यामध्ये गुण आणि अवगुण असतात.व्यक्तीमध्ये असलेल्या सदगुणांमुळे माणूस आणि प्राणी यांच्यात फरक निर्माण होतो. मनुष्यामध्ये असे अनेक गुण असतात ज्याद्वारे त्याचे जीवन हे स्वर्गासारखे सुखकारक बनत असते. तर व्यक्तीतील अवगुणांमुळे त्यांचे जीवन हे नर्क बनत असते.   

मनी असावी परोपकाराची भावना 

परोपकरणं येषां जागर्ति हृद्ये सताम् |
परोपकरणं येषां जागर्ति हृद्ये सताम् |

आचार्य चाणक्य या श्लोकाद्वारे सांगतात की, प्रत्येक मानवामध्ये दानाची भावना असली पाहिजे. ज्याचे हृदय परोपकाराने भरलेले असते, त्याला देव सदैव साथ देतो. अशा लोकांना कधीही संकटांना सामोरे जावे लागत नाही. त्यांच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो. अशा लोकांना प्रत्येक पावलावर यश मिळते. दानशूर व्यक्ती दु:खाशिवाय जीवन जगत असतो.

यदि रामा यदि च रमा अहितनयो विनयगुणोपेतः।
यदि तनये तनयोत्पतिः सुखमिन्द्रे किमाधिक्यम् ।।

आचार्य चाणक्य या श्लोकाद्वारे म्हणतात की मानवी जीवनासाठी तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. जर कोणाला पतीशी प्रामाणिक राहणारी पत्नी, गुणवान अपत्य आणि गरजा पुर्ण करता येतील असे धन मिळाल्यास व्यक्तीचे जीवन हे स्वर्ग वाटत असते. 

आहरनिद्रामय मैथुननानि, समानि चैतानि नृणा पशूनाम।
ज्ञानपं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीना: पशुभि: समाना:।।


आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक मनुष्य इतर सजीवांप्रमाणे अन्न, निद्रा, संभोग आणि संतती या सर्व क्रिया करतो. अशा स्थितीत पाहिले तर मनुष्य आणि प्राणी यांच्यात फक्त भौतिक रचनेचा फरक उरतो. पण त्यानंतरही त्यांचे मानवाचे आचरण त्यांना प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनवते. जे व्यक्ती धर्म- कर्म- नैतिक गुणांनी परिपूर्ण असतात. तेच लोक खरे मानव असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी