Chanakya Niti in marathi:आचार्य चाणक्य हे राजकारण आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक मानले जातात. आचार्यांचे नीतिशास्त्र लोकांना 'चाणक्य नीति' या नावाने माहिती आहे. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत आणि बर्याच अंशी बरोबरही आहेत. आचार्यांच्या या गोष्टी शिकून माणूस आजच्या सर्व संकटांना सहज सामोरे जाऊ शकतो. चाणक्याने नीतिशास्त्रात मानवाच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केलं आहे. आचार्यांनी त्यात जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. (Chanakya Niti : 'These' three things disturb a person's life)
अधिक वाचा : उत्तर भारतात सर्वाधिक हुडहुडी, राज्याातील तापमानही झालं कमी
आपल्या चाणक्य नीतिमध्ये आचार्यांनी मानवाचे जीवन सुखी आणि सोपं होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दुःख हे येतचं असते. दुखात व्यक्तीने खचून न जाता स्वत:ला मजबूत केले पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या सुखी जीवनाला दुखी करत असतात. या घटना किंवा गोष्टी काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
अधिक वाचा : बलात्काराचा तक्रार करणाऱ्याची चौकशी करा; खा. शेवाळेंची मागणी
आचार्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार असतात. आयुष्यभर टिकणारे नाते असते. वयाच्या शेवटच्या टप्प्यावर यापैकी एकाने जग सोडले तर जगणाऱ्याचे उर्वरित आयुष्य दु:खाने भरुन जात असते. आयुष्याच्या जोडीदाराशिवाय म्हातारपण पार करणं खूप अवघड आहे. ही परिस्थिती लोकांना खूप त्रास देते.
आचार्य चाणक्य मानतात की, जीवन सोपे आणि आनंदी करण्यासाठी पैसा असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यभर कष्ट करून कमावलेला पैसा कोणी लुटला तर जीवनात दु:खाचा डोंगर कोसळतो. तसेच आपण उपचारासाठी एखाद्या ठिकाणी गुंतवणू म्हणून आपल्या आयुष्याची कमाई लावत असाल आणि त्यातून आपल्या हाती निराशा आली असेल तर माणसाला मोठं दुख होत असते, अशा स्थितीत आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे पीडितेला वाटते. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून जगण्याचे मुख्य साधन हिसकावले जाते, तेव्हा तो विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचतो.
अधिक वाचा : अवघ्या 9 महिन्यात 2 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात वाईट परिस्थिती असते जेव्हा त्याला काही कारणास्तव दुसऱ्याच्या घरी राहावे लागते. ही परिस्थिती प्रत्येकासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. दुसर्याच्या घरी राहून ती व्यक्ती इतर लोकांवर अवलंबून तर राहतेच शिवाय ती उपकाराच्या बोझ्याखाली दबत असते. यामुळे ती व्यक्त आपला स्वाभिमान गमावत असते.