चाणक्य नीती : संकटाच्यावेळीच होते बायको, नोकर आणि मित्रांची ओळख

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jul 22, 2021 | 09:01 IST

चाणक्य नीतीनुसार, पत्नी, मित्र आणि सेवकाची ओळख संकटाच्यावेळीच होत असते. यामुळे संकटाच्यावेळी काही गोष्टींची दक्षता घ्यावी.

Chanakya Niti  Wife and servants,friends  are known only in times of crisis
चाणक्य नीती :संकटाच्यावेळीच होते बायको आणि मित्राची ओळख  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • माणसाने धैर्याने संकटांचा सामना केला पाहिजे.
  • संकटांच्या वेळी व्यक्तीच्या धैर्य आणि कुशलतेची परीक्षा होते.
  • संकटाच्यावेळी धन खऱ्या मित्राची भूमिका निभावत असते.

नवी दिल्ली : चाणक्य नीतीनुसार, पत्नी, मित्र आणि सेवकाची ओळख संकटाच्यावेळीच होत असते. यामुळे संकटाच्यावेळी काही गोष्टींची दक्षता घ्यावी. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येत असतात. या कठीण परिस्थितीत माणसाने धैर्याने संकटांचा सामना केला पाहिजे. जर आव्हाने स्विकारण्यास घाबरत असाल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाहीत. जाणकारांच्या मते, ज्याप्रकारे रात्रीनंतर दिवस येत असतो त्याचप्रमाणे दु:खानंतर सूख मिळत असते. संकटांना व्यक्तीने घाबरू नये तर संकटांशी दोन हात आपण कसे करणार याचा विचार केला पाहिजे. संकटे आपल्याला आपल्या नातेसंबंधांची ओळख करून देत असतात. सुखात अनेकजण आपल्याकडे येत असतात, पण खरं नातं तेच जे संकटाच्यावेळी कामात येईल किंवा मदत करेल. 

चाणक्यांच्या मते, संकटांना घाबरू नये. संकटांच्या वेळी व्यक्तीच्या धैर्य आणि कुशलतेची परीक्षा होते. त्याचवेळी नात्यांची खरी ओळख होत असते. प्रत्येक व्यक्ती हा मित्र नसतो, याची ओळख आपल्याला संकटाच्यावेळी होत असते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दुखावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुख येत असते. दु:ख आणि संकटांपासून कोणी वाचू शकत नाही. यामुळे व्यक्तीने संकटांचा सामना करण्यास तयार असलं पाहिजे. संकटे आल्यानंतर व्यक्तीने आपल्याकडील चांगल्या गुणांचा त्याग करू नये. 

धनाचे महत्व

संकटाच्या काळात आपल्याला पैशांचे महत्त्व समजते. चाणक्य म्हणतात, संकटाच्यावेळी धन खऱ्या मित्राची भूमिका निभावत असते. यामुळे धनाची जपणूक केली पाहिजे. यामुळे धनाची केलेली बचत आपल्याला संकटात उपयोगी पडत असते. व्यक्तीवर संकटे आली तर सर्वात आधी स्वार्थी लोक आपल्याला सोडून जात असतात. यामुळे संकटात धन मोठी भूमिका पार पाडत असतं.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी