Chanakya Niti: अशा पुरुषांकडे महिला होतात आकर्षित, हे काम करण्यासाठी असतात तयार

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 12, 2023 | 21:02 IST

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये जीवनाच्या सखोलतेचे वर्णन केले आहे.  जर एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंदी राहायचे असेल तर त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात आचार्य चाणक्यांच्या नीतिचा अवलंब केला पाहिजे. देशातील प्रसिद्ध अर्थतज्ञ आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाचा डंका वाजवला आहे.

Chanakya Niti:  Women are attracted to such men, they are ready to work
Chanakya Niti: अशा पुरुषांकडे महिला होतात आकर्षित  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलांना असे पुरुष खूप आवडतात जे आपल्या जोडीदाराचे रहस्य शेअर करत नाहीत.
  • जे पुरुष सन्मानाची काळजी घेत नाहीत आणि त्यांच्यापासून अंतर ठेवू इच्छितात ते स्त्रियांना आवडत नाहीत.
  • पुरुष स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आदर करत असेल तर स्त्रिया त्याला आपला सर्वोत्तम जोडीदार मानतात.

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये जीवनाच्या सखोलतेचे वर्णन केले आहे.  जर एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंदी राहायचे असेल तर त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात आचार्य चाणक्यांच्या नीतिचा अवलंब केला पाहिजे. देशातील प्रसिद्ध अर्थतज्ञ आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाचा डंका वाजवला आहे. त्यांनी आपल्या लेखांमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्याने केवळ पुरुषच नाही तर महिलांचेही जीवन आनंदाने जात असते. आनंदी आणि हसतमुख जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच चांगला जोडीदार हवा असतो. लग्नानंतरचे जीवन असो वा लव लाइफ. स्त्री आणि पुरुषांमध्ये विश्वास असलाच पाहिजे. (Chanakya Niti:  Women are attracted to such men, they are ready to work)

अधिक वाचा  :  श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव
 

जर विश्वास निर्माण झाला तर समजून घ्या की तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये  या विषयावर व्यावहारिक ज्ञान दिले आहे. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी महिलांना  पुरुष कसे आवडतात हे पण सांगितले आहे. 

अधिक वाचा  :  स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ

चाणक्य नीतीमध्ये पुरुषांबद्दलचे असे गुण सांगितले आहेत, ज्यामुळे महिला आकर्षित होतात. चाणक्य नीतिमध्ये  सांगितले आहे की, पुरुषांच्या कोणत्या गुणांमुळे महिला आनंदी राहतात आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचार कधीही करत नाही. चला जाणून घेऊया ते कोणते गुण आहेत, ज्यामुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात. 

गुप्तता ठेवतात

चाणक्यच्या मते, महिलांना असे पुरुष खूप आवडतात जे आपल्या जोडीदाराचे रहस्य शेअर करत नाहीत. स्त्रिया अशा पुरुषांवर जीव ओवाळून टाकतात. जोडीदाराचे रहस्य नेहमी गुप्त ठेवणारे पुरुष महिलांना खूप आवडतात. स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच हा गुण असलेला पुरुष त्यांच्यासोबत ठेवायचा असतो आणि त्याच्यावर खूप प्रेम देखील असते. 

अधिक वाचा  :  रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर होईल मोठं नुकसान

मान-सन्मान देणारे पुरुष

पुरुषांनी आपल्या अब्रुला धक्का लागू नये, अशी महिलांची नेहमीच इच्छा असते. आदरणीय पुरुष स्त्रियांना खूप आवडतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया नेहमीच ओढल्या जातात. जे पुरुष सन्मानाची काळजी घेत नाहीत आणि त्यांच्यापासून अंतर ठेवू इच्छितात ते स्त्रियांना आवडत नाहीत.

स्वातंत्र्यावर अंकुश न ठेवणारा 

चाणक्याच्या मते, महिलांना त्यांचे स्वातंत्र्य खूप आवडते. जर पुरुष स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आदर करत असेल तर स्त्रिया त्याला आपला सर्वोत्तम जोडीदार मानतात. स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांनी प्रत्येक गोष्टीवर बंधने घालू नयेत. स्त्रीवर संशय न घेणारा व्यक्ती महिलांना अशा पुरुषांसोबत आयुष्य घालवायचे असते.

अंहकार ठेवू नका 

महिलांना अहंकारी पुरुष कधीच आवडत नाहीत. नात्यात बढाई मारणाऱ्यांपासून महिला अंतर ठेवतात. महिलांच्या मते अहंकारी पुरुष कधीही चांगला जोडीदार असू शकत नाही. स्त्रियांना असा पुरुष आवडतो जो जास्त बढाई मारत नाही आणि त्याला आपला जीवनसाथी बनवू इच्छितो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी