chanakya niti, women are more intelligent brave hungry than men : चाणक्य निती सत्याची जाणीव करून देते. वास्तवाचे भान आणून देते. विचार आणि कृती करण्यासाठी दिशादर्शन करते. नितीनियम सांगते, देशहित कशात आहे आणि सज्जन व्यक्तीने कसे वागावे याचे मार्गदर्शन करते. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी चाणक्य नितीचा संबंध दिसून येतो. या नितीशास्त्रात सदैव सावध राहण्यासाठी, चतुराईने वर्तन करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
चाणक्य निती महिला आणि पुरुष यांचे गुण आणि दोष सांगते. चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात पुरुषांपेक्षा कोणत्या तीन बाबतीत महिला पुढे असतात हे सांगितले आहे.
स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोष्टगुण उच्यते।।
चाणक्य निती मधील हा श्लोक आहे. या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्या यांनी पुरुषांपेक्षा महिलांना कोणत्या तीन गोष्टींची जास्त गरज आहे हे समजावून सांगितले आहे.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.