चंदना हीरन: २२ वर्षीय मुंबईकर तरुणी, जिच्या याचिकेनंतर ‘Fair & Lovely’चं नाव बदलणार

कॉस्मॅटिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून तरुणींना भूरळ पाडणाऱ्या ‘फेअर अँड लव्हली’चं नाव आता बदलणार आहे. नुकताच कंपनीनं यातील ‘फेअर’ हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतलाय. जाणून घ्या याबाबत...

Chandana Hiran
२२ वर्षीय मुंबईकर तरुणीमुळे बदलणार ‘Fair & Lovely’चं नाव 

थोडं पण कामाचं

  • हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हली विरोधात मुंबईतील तरुणीची याचिका
  • मुंबईच्या २२ वर्षीय तरुणी चंदना हीरननं दाखल केली होती ऑनलाईन याचिका
  • यानंतर कंपनीनं आपल्या नावात बदल करण्याचा केला निर्णय

मुंबई: हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीनं नुकताच आपला प्रसिद्ध ब्रँड असलेल्या फेअर अँड लव्हली (Fair & Lovely) याच्या नावातील फेअर शब्द हटविण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं आपल्या वक्तव्यात सांगितलं की, यावर अनेक वर्षांपासून भेदभाव निर्माण करत असल्याचा आरोप केला जातोय, यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतलाय. हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीच्या या निर्णयामागे सर्वात मोठं कारण मुंबईतील एक तरुणी चंदना हीरन ठरलीय.

२२ वर्षीय चंदना चार्टर्ड अकाऊंटसीच्या अखेरच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी तिनं ‘हिंदुस्तान यूनिलिव्हर’ विरोधात एक ऑनलाईन याचिका दाखल केली होती, ज्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं. जवळपास १५ हजार लोकांनी यात आपला होकार दर्शवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार चंदनानं आपल्या याचिकेत कॉस्मेटिक कंपन्यांना अशा पद्धतीनं ब्युटी प्रॉडक्ट्सचं ब्रँडिंग न करण्याची मागणी केली होती, ज्यात नुसतं ‘फेअर’ला प्रमोट केलं जातं. आपल्या याचिकेत तिनं कंपन्यांना प्रश्न विचारला होता की, अखेर फेअरच चांगलं का आहे? डार्क का नाही?

चंदनाच्या या मोहिमेला अमेरिकेत जॉर्ज फ्लायड यांच्या मृत्यूनंतर असलेल्या नाराजीचा आणि आंदोलन ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’मुळे पण पाठिंबा मिळाला. या आंदोलानानंतर जगभरात कृष्णवर्णीय लोकांसोबत भेदभाव केला जात असण्याच्या घटनांवर चर्चा सुरू झाली होती. एका न्यूज चॅनेलसोबत चंदनानं म्हटलं, ‘व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणं योग्य नाही. माझा रंग सावळा आहे, यामुळे मला कुठेही फरक पडत नाही.’

‘मी नेहमी बघते की, माझ्या सारख्या दिसणाऱ्या अनेक मुलींना आपल्या रंगामुळे त्रास सहन करावा लागतो. चित्रपटसृष्टीत पण माझ्या त्वचेच्या रंगासारखी कुठलीही टॉपची अभिनेत्री नाहीय. मॅगझिनमध्ये पण सावळ्या रंगाच्या त्वचा एंडोर्स केली जात नाही. एव्हढंच नव्हे तर सोशल मीडिया पण ब्युटी फिल्टर्स आणि फोटो एडिटिंग टूल्समुळे भरलेले आहेत, जे योग्य नाही.’

आपल्या ट्वीटमध्ये चंदनानं आपल्या याचिकेचं समर्थन करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले आहे. सोबतच हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीनं आपल्या ब्रँड फेअर अँड लव्हलीमधून फेअर शब्द हटविण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी