Sambhaji Maharaj Balidan Din : 11 मार्च हा दिवस संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून का ओळखला जातो 'हे' माहिती आहे का?

Chatrapati Sambhaji Maharaj Balidan Din, Things Must Know About Chhatrapati Sambhaji Maharaj, Chatrapati Shambhuraje Balidan Din : रयतेचे लाडके शंभुराजे अर्थात छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. मुघल बादशहा औरंगजेब याने संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली.

Chatrapati Sambhaji Maharaj Balidan Din
छत्रपती संभाजी महाराजांविषयी 'हे' माहिती आहेत का?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी 'हे' माहिती आहेत का?
  • संभाजी राजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला
  • मुघल बादशहा औरंगजेब याने संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली

Chatrapati Sambhaji Maharaj Balidan Din, Things Must Know About Chhatrapati Sambhaji Maharaj, Chatrapati Shambhuraje Balidan Din : रयतेचे लाडके शंभुराजे अर्थात छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. मराठ्यांचा तेव्हाचा प्रमुख शत्रू मुघल बादशहा औरंगजेब याला संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने सलग नऊ वर्षे सळो की पळो करून सोडले होते. 

संभाजी राजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. यामुळे 16 जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतात. संभाजी राजे त्यांच्या कारकिर्दीत 201 लढाया लढले. यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झालेला नाही. पण पैशांसाठी झालेल्या फितुरीचा फटका बसला आणि संभाजी महाराज जीवंत पकडले गेले. यानंतर संभाजी राजांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता. पण राजांनी धर्मांतर करण्याऐवजी प्राणाचे बलिदान देण्याची तयारी दाखवली. अखेर मुघल बादशहा औरंगजेब याने संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली. याच कारणामुळे 11 मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून ओळखला जातो.

संभाजी महाराजांविषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?

  1. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. सईबाईंच्या अकाली निधनाने संभाजी राजे बालपणीच पोरके झाले. जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले. जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाची महिलेने संभाजी राजांचे संगोपन केले. पुढे सोयराबाईंनी सुद्धा संभाजीराजांचा सांभाळ केला. 
  2. मुघल दरबार आणि तिथले राजकारण संभाजी राजांनी लहान वयातच जवळून बघितले आणि समजून घेतले. 
  3. संभाजी राजे वयाच्या नवव्या वर्षी मुघल दरबारात पाच हजारांचे मनसबदार झाले. शिवाजी राजांसोबत आग्रा येथे गेले. पुढे आग्रा येथून सुटका करून घेऊन शिवाजी राजे मजल दरमजल करत राजधानीत परतले. पण सुरक्षिततेसाठी संभाजी राजांना काही काळ मथुरा येथे ठेवण्यात आले होते. 
  4. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी संभाजी राजांना साहित्य, कविता यांची आवड निर्माण झाली. याच काळात ते संस्कृत पंडित झाले. बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ तसेच इतर भाषांतील 3 ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले.
  5. संभाजी राजे 18व्या वर्षी युवराज आणि 23व्या वर्षी छत्रपती झाले.
  6. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  7. संभाजी राजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. यामुळे 16 जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतात.
  8. मुघल बादशहा औरंगजेब याने संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली. याच कारणामुळे 11 मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून ओळखला जातो.

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी