Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023: हिंदू हृदयसम्राट, महान पराक्रमी, हिंदवी स्वराजचे संस्थापक, राष्ट्र नायक थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. दीर्घ आजारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त्याने Messages, Images, WhatsApp Status द्वारे राजेंना करा अभिवादन. ( Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 Messages: homage to Chhatrapati Shivaji through WhatsApp, Facebook images)
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीस शिवरायांस मानाचा मुजरा!
एक विचार समानतेचा एक विचार नीतीचा ना धर्माचा ना जातीचा राजा माझा फक्त मातीचा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
रयतेसाठी झटला तो,
स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
रयतेपायी तो जन्मभर झिजला... रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला... मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला... असा एक शिवसूर्य रायगडी निजला...!
पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!