chhatrapati shivaji maharaj punyatithi bhashan : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, बुद्धिमान, शूर आणि दयाळू राज्यकर्ते होते. आज शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे.आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत आहोत. महाराजांना आपल्या भाषणातून अभिवादन करू.( chhatrapati shivaji maharaj punyatithi bhashan in marathi)
अधिक वाचा : WhatsApp, Facebook Messagesने द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी मराठी भाषण
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो, मी आज मराठा स्रामाज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी काही गोष्टी आपल्या भाषणाच्या माध्यामातून सांगणार आहे. महाराजांचे विचार, त्याचे कर्तृत्त्व, याची माहिती आपल्याला होईल.
शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला होता. शिवाजीचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई. माता जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही त्यांच्या गुणांनी आणि वागण्यात धाडसी होत्या. वयाच्या 50 वर्षी शिवाजी महाराज यांनी या जगाचा निरोप घेतला. हा दिवस हनुमान जयंतीचा होता. एक उत्तम शासक, उत्तम नेता, उत्तम लढवय्या, साथीदारांची काळजी घेणारा सहकारी, दूरदृष्टी असणारा राजा असं शिवाजी महाराज यांच्याविषयी म्हणता येईल.
आई जिजाऊ आणि वडील शहाजी यांच्या छत्रछायेखाली आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनात शिवरायांनी स्वराज्याचे धडे गिरवले. आपल्या दुरदृष्टीने शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी काव्याने शत्रूला नामोहरम करणे हे तंत्र आजही अनेक देश आपल्या सैन्यदलाला शिकवतात. शिवाजी महाराज ह दैव रुप म्हटलं तरी चालेल.
अख्या देशात मुघल साम्रज्य असताना मराठा साम्राज्याची सुरुवात महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून केली होती. महाराष्ट्रात परकीय लोकांच्या सत्ता होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापित केले.
शिवाजी महाराज लहानपणापासून शूर होते. वयाच्या 16 वर्षीचं पुण्याचा तोरण किल्ला जिंकला होता. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराज यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं. त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा,पराक्रम व निष्कलंक चारित्र्य.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला मात दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले. अनेक शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली. 6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर राज्यात स्वराज्य सुरू झाले. स्वराज्य म्हणजे माझं स्व:ताचं राज्य असं लोकांना वाटलं पाहिजे. ज्या राज्यात रयतेवर अन्याय होणार नाही.
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना शिवाजी महाराज मदत करत असत. शेतकऱ्यांचा सर्व कर माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.
अधिक वाचा : हनुमानाची कशी कराल पूजा; जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व,नियम
प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. एक आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराज यांना आठवलं जातं. अनेक शिवप्रेमी त्यांना जाणता राजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. मावळ्यांनो आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.