मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात अनोखे गुण, कोणी असतं क्रिएटिव तर कोणी मेहनती

लाइफफंडा
भरत जाधव
Updated May 05, 2022 | 17:56 IST

प्रत्येक महिना खास आणि वेगळा असतो. प्रत्येक महिन्यात जन्माला (Born) आलेली मुलं स्वतःच असं वेगळेपण घेऊन येतात. जर तुमचं मुलं देखील मे महिन्यात (month ) जन्माला आलं असेल तर त्याचं वेगळेपण समजून घेणं गरजेचं आहे.

Children born in the month of May have unique qualities
मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात अनोखे गुण  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मे महिन्यात जन्माला आलेली मुलं खूप मेहनती असतात.
  • मे महिन्यात जन्माला आलेली मुलं कला आणि साहित्यावर विशेष प्रेम करतात.

नवी दिल्ली : प्रत्येक महिना खास आणि वेगळा असतो. प्रत्येक महिन्यात जन्माला (Born) आलेली मुलं स्वतःच असं वेगळेपण घेऊन येतात. जर तुमचं मुलं देखील मे महिन्यात (month ) जन्माला आलं असेल तर त्याचं वेगळेपण समजून घेणं गरजेचं आहे. मुलं जन्माला येताना त्याचा स्वभाव आणि काही खास गुणधर्म सोबत घेऊन येतो

मुलं असतात ​मेहनती 

मे महिन्यात जन्माला आलेली मुलं खूप मेहनती असतात. प्रत्येक कामात आपलं बेस्ट देण्याचा या मुलांचा प्रयत्न असतो. प्रत्येक मुलं अतिशय कष्ट करणारे असतात. ही मुलं शॉर्ट कट घेण्यापासून स्वतः वाचतात. कायम काम व्यवस्थित करण्याकडे या मुलांचा कल असतो. 

​स्वतःला करतात मोटिवेट

ही मुलं स्वतःखूप जास्त मोटिवेट करतात. त्यांची इच्छाशक्ती दृढ असते. या इच्छाशक्तीकरता ते प्रयत्नशील असतात. ही मुलं आपल्या कामाबद्दल खूप पॅशिनेट असतात. काम करण्यासाठी या मुलांमध्ये स्वतःलाच मोटिवेट करण्याची फार ताकद असते. 

​ क्रिएटिवपणा 

मे महिन्यात जन्माला आलेली मुलं कला आणि साहित्यावर विशेष प्रेम करतात. मात्र ही मुलं आपल्या गुणांना लपवून ठेवत असतात. अशावेळी या मुलांमधील हे कलागुण ओळखणे गरजेचे असते. ही मुलं आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना आपले कलागुण दाखवत असतात. 

कधी-कधी असतो जिद्दी स्वभाव

मे महिन्यात जन्माला आलेली मुलं खूप कूल स्वभावाची असतात. ही मुलं कधी कधी जिद्दी देखील असतात. ही मुलं आपल्या पद्धतीने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या हट्टी स्वभावामुळे ही मुलं स्वतःच वेगळेपण स्वतः निर्माण करतात. 

Read Also : आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बारामतीची आर्या

​भावनिक 

ही मुलं खूप भावूक असतात. आपल्या जवळच्या व्यक्तींवर याचं अतोनात प्रेम करत असतात. भावनिक असल्यानंतर ही मुलं फार कमी लोकांसमोर मोकळे होतात. 

Read Also :  Jammu Kashmir: सांबा सेक्टरजवळ सापडला बोगदा

खर्चिक असतात

मे महिन्यात जन्माला आलेली मुलं पैशांच्याबाबतीत खूप खर्चिक असतात. यांना ऐश्वर्यात राहायला आवडतं. मात्र याचा असा अर्थ नाही की, ही मुलं पैसे वाचवत नाहीत. 

प्रवास आवडतो

मे महिन्यात जन्माला आलेल्या या मुलांना प्रवास खूप आवडत असतो. या मुलांना नव्या ठिकाणी जाणं अधिक पसंत आहे. मे महिन्यात जन्माला आलेली मुलं मैत्री पटकन करतात. या मुलांना ट्रव्हलर म्हटलं तर खोटं ठरणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी