तीन मुलं आणि एका मुलीचे वडील आहेत सैफ अली खान, किती आहे यांच्या वयातील अंतर?

लाइफफंडा
Updated Feb 23, 2021 | 08:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेत्री करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. करिनाने एका मुलाला जन्म दिला आहे. करिनाने २१ फेब्रुवारीला तैमूरच्या लहान भावाला जन्म दिला. करिना दुसऱ्यांदा आई तर, सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाला.

children of Saif Ali Khan and their ages
सैफ अली खान यांची मुलं   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • चौथ्यांदा वडील बनले सैफ अली खान 
  • सैफ अली खानला एक मुलगी व तीन मुले आहेत
  • किती आहे चौघांच्या वयातील अंतर?

मुंबईः अभिनेत्री करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. करिनाने एका मुलाला जन्म दिला आहे. करिनाने २१ फेब्रुवारीला तैमूरच्या लहान भावाला जन्म दिला. करिना दुसऱ्यांदा आई तर, सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाला.

करिना कपूर याच्या आधी सैफ अली खान याने १९९१ मध्ये अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केले होते. सैफ अली खान आणि अमृता सिंह या दांपत्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं झाली. यानंतर, अमृताशी घटस्फोट घेऊन सैफ अली खानने करिनाशी लग्न केले. आता करिनालाही दोन मुलं झाले आहेत. तुम्हाला माहितीय सैफ अली खानच्या चारही मुलांच्या वयात किती अंतर आहे?

सारा अली खान

सैफ आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ मध्ये झाला होता आणि ती २५ वर्षाची आहे. 

इब्राहिम अली खान

सैफ आणि अमृता यांचा मुलगा इब्राहिम याचा जन्म ५ मार्च २००१ ला झाला होता. तो सारापेक्षा सहा वर्ष लहान आहे. 

तैमूर अली खान

सैफ अली खान आणि त्यांची दुसरी पत्नी करिना कपूर खान यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान याचा जन्म  २० डिसेंबर २०१६ला झाला होता. तो आत्ता चार वर्षांचा आहे.  

सैफ-करिना यांचा दुसरा मुलगा

सैफ आणि करिना यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म २१ फेब्रुवारी २०२१ ला झाला आहे. तो सारापेक्षा २५, इब्राहिमपेक्षा १९ आणि तैमूरपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. तसेच, सारा तैमूरहून २१ वर्षे आणि इब्राहिमपेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे.

कसं आहे नातं

सैफ व अमृता यांची मुलं करिनाच्याही खूप जवळ आहेत. करिनाने एका मुलाखतीत सारा व इब्राहिम आपले मित्र असल्याचे म्हटले होते. करिनाने अनेकदा साराचे कौतुकही केलेले आहे. सारानेही अनेक मुलाखतींमध्ये करिना केवळ मैत्रीणच नाही तर, त्यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले आहे. 

सैफ अली खानच्या आगामी कामाविषयी सांगायचे तर तो ओम राउत यांच्या आदिपुरुष या सिनेमात लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. याव्यतिरिक्त तो भूत पुलिस या सिनेमात दिसणार आहे, यात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिस असतील. तसेच, तो बंटी और बबली 2 मध्येही काम करणार आहेत. यात त्याच्यासोबतच राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदीही असतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही. शर्मा करत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी