Children's Day: बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Happy Children's Day (Bal Diwas) messages: बालदिनाच्या निमित्ताने व्हॉट्सअॅप, फेसबूक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणारे मेसेजेस शेअर करत असतात.

Childrens day 2022
बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Children's Day: बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज
  • जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करतात
  • भारतात 14 नोव्हेंरला साजरा होतो बालदिन

Happy Children's Day 2020 messages: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा वाढदिवस हा बालदिन (Bal Diwas) म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे जनतेचे आवडते पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलं प्रिय होती आणि मुलांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते.  मुलंही त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. बालदिनाच्या (Childrens Day) निमित्ताने दरवर्षी शाळांमध्ये आणि इतर ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. बालदिनाच्या निमित्ताने मुलांना त्यांच्या हक्कांबाबतही जागरूक केले जाते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे बालदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होत नाहीये मात्र, असे असले तरी तुम्ही सोशल मीडियात मेसेजेस शेअर करुन बालदिनाच्या शुभेच्छा (Happy Children's Day) देऊ शकतात. पाहूयात बालदिनाच्या शुभेच्छा देणारे सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस.

मनाची निरागसता, 

ह्रदयाची कोमलता, 

ज्ञानाची उत्सुकता, 

भविष्याची आशा...

उद्याचा देश घडविणाऱ्या 

बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा !

दिवस आनंदाचा

निरागसतेचा 

उत्साहाचा 

त्यांच्या कौतुकाचा...

बालदिनाच्या शुभेच्छा 

कालपण, आजपण आणि उद्यापण...

जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते 

बालपण !!! 

बालदिनाच्या सर्व बालमित्र आणि बालगोपाळांना शुभेच्छा...

मनात बालपण 

जपणाऱ्या प्रत्येकास 

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पाखरांची चपळता,

प्रात:काळाची सौम्य उज्वलता 

आणि निर्झराचा खळखळाट म्हणजे मुले...

बालदिनाच्या शुभेच्छा 

लहानपणी सगळे विचारायचे 

की मोठेपणी काय व्हायचय?

पण आता विचारलं तर...

पुन्हा एकदा लहान व्हायचय 

देशाचे उज्वल भविष्य 

असलेल्या सर्व लहानग्यांना 

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उज्वल भारताचे भविष्य 

असणाऱ्या बाल मित्रांना 

बालदिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी